Join us

अनुराग कश्यपला अमृता सुभाषचा फुल ऑन सपोर्ट, म्हणाली "तू नेहमीच मला आदर दिलास"

By सुवर्णा जैन | Published: September 21, 2020 1:42 PM

पायल घोषने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर ट्विट करून तिने पंतप्रधानांकडे मदतीची मागणीही केली.

अभिनेत्री पायल घोष हिने लावलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप चर्चेत आहे. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत.. इतकेच नाही तर ट्विट करून तिने पंतप्रधानांकडे मदतीची मागणीही केली. तेच अनुरागने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी अनुरागच्या सपोर्टसाठी समोर येत आहेत. राधिका आपटे आणि तापसी पन्नू याच यादीत आता मराठी अभिनेत्री अमृता सुभाषचेही नाव जोडलं गेलंय.

 

अनुराग कश्यपला सपोर्ट करण्यासाठी तिने सोशलम मीडियावर ट्विट केलं आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तू  प्रामाणिक व्यक्ती  आहेस. नेहमीच तुझ्याकडून मला आदर मिळाला. तुझ्याकडून नेहमीच मला सन्मानाची वागणूक मिळाली. तू सेटवर मला नेहमीच आदर दिला. आजपर्यंत मी कधीच तुझ्याबद्दलच्या भावना तुझ्याकडे व्यक्त केल्या नव्हत्या. याची कधीच गरजही वाटली नव्हती. मात्र आज मला तुझे मानापासून आभार मानायचे आहे. तू मला दिलेल्या आदरासाठी खूप धन्यवाद.

राधिका आपटेनेही तुझ्यासोबत सुरक्षित जाणवलं असल्याचे भावना केली व्यक्त

राधिका आपटेने इन्स्टाग्रामवर अनुराग कश्यपसोबतचा हसतानाचा फोटो शेअर केला. तिने लिहिले की, 'अनुराग कश्यप तू माझा सर्वात जवळचा मित्र राहिलाय. तू मला प्रेरणा दिली आहे आणि नेहमी मला साथ दिली. तू मला नेहमीच बरोबरीचा हक्क दिला. आपलं एकमेकांप्रति जे प्रेम आहे, जो सन्मान आहे तो वेगळा आहे. ज्या दिवसापासून मी तुला ओळखते, तेव्हापासून मला स्वत:ला तुझ्यासोबत सुरक्षित जाणवलं आहे. तू नेहमी माझा खरा मित्र राहिलाय आणि राहणार. लव्ह यू'.

 तापसी पन्नू अनुराग कश्यपच्या सपोर्टमध्ये  आली समोर

अनुराग कश्यपवर आऱोप झाल्यावर त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री तापसी पन्नू त्याच्या सपोर्टमध्ये समोर आली आहे. तापसीने सुद्धा अनुरागसोबतचा फोटो शेअर केला. तिने पोस्टमध्ये लिहिले की, 'तू माझा मित्र आणि सर्वात मोठा फेमिनिस्ट आहे. ज्याला मी ओळखते. तुझ्या नव्या आर्ट पीसच्या सेटवर लवकरच भेट होईल. ज्यात दाखवलं जातं की, तू तयार केलेल्या दुनियेतील महिला किती शक्तिशाली आणि सार्थक असतात'.

पायलच्या सपोर्टमध्ये कंगना म्हणाली बॉलिवूड पूर्णपणे लैंगिक भक्षकांनी भरलेले 

पायलच्या आरोपनंतर कंगनाने ट्विट करत लिहिले की, 'बॉलिवूड पूर्णपणे लैंगिक भक्षकांनी भरलेले आहे. हे लोक केवळ लोकांना दाखवण्यासाठी लग्न करतात. प्रत्यक्षात दरदिवशी स्वत:ला खूश करण्यासाठी त्यांना सुंदर मुलगी हवी असते. केवळ मुलीच नाही तर सुंदर व गरजू मुलांसोबतही ते हेच करतात. माझ्यासोबत जे काही झाले, त्याचा मी माझ्यापरीने निकाल लावला. मला मीटूची गरज नाही. पण मुलींनी याबद्दल अवश्य विचार करावा', असे आणखी एक ट्विट कंगनाने केले आहे.

टॅग्स :अनुराग कश्यपअमृता सुभाष