Join us  

रणबीरनंतर आता 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी विकी कौशलबरोबर करणार रोमान्स, शूटिंगदरम्यानचे 'ते' फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:47 AM

रणबीरनंतर तृप्ती विकी कौशलबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. तृप्तीच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन देऊन बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली. तृप्तीच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 'ॲनिमल'मुळे तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अगदी काही वेळ स्क्रीनवर दिसूनही तृप्तीने संपूर्ण लाइमलाइट खेचून घेतलं आहे. रणबीरनंतर आता तृप्ती विकी कौशलबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. तृप्तीच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

तृप्ती डिमरी 'मेरे मेहबूब मेरे सनम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात ती बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तृप्ती आणि विकी ही फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा तृप्तीचा हॉट अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मेरे मेहबूब मेरे सनम च्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये तृप्ती विकी कौशलबरोबर रोमान्स करताना दिसत आहे. 

'मेरे मेहबूब मेरे सनम' चित्रपटातील एक रोमँटिक गाणं गेल्या वर्षी युरोपातील क्रोओशिया या शहरात शूट करण्यात आलं होतं. या गाण्याच्या शूटिंगरम्यानचे काही फोटो लीक झाले होते. आता तृप्ती डिमरी चर्चेत आल्यामुळे पुन्हा हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नॅशनल क्रशचा विकी कौशलबरोबरचा रोमँटिक अंदाज पाहून चाहते भारावून गेले आहेत. 

दरम्यान, तृप्ती डिमरी 'ॲनिमल' सिनेमामुळे मिळालेल्या यशाने थक्क झाली आहे. या सिनेमामुळे एका रात्रीत तृप्ती स्टार झाली आहे. 'ॲनिमल'ची बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौड अजूनही सुरूच आहे. या सिनेमाने १२ दिवसांत ४५८ कोटींची कमाई केली आहे. 

टॅग्स :विकी कौशलसिनेमासेलिब्रिटी