Join us

रानू मंडलनंतर व्हायरल झाला सनी बाबा, सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 16:32 IST

बिहारचा सनी बाबा...

ठळक मुद्दे हा व्हिडिओ वंदना जयराजन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

 रानू मंडलला आताश: कोण ओळखत नाही? रेल्वे स्थानकावर गाणं गात भीक मागणा-या रानू एका गाण्याच्या व्हिडीओमुळे रातोरात स्टार झाली. एका व्हिडीओने तिचे नशीब बदलले. हिमेश रेशमियासारख्या दिग्गज संगीतकाराने रानूला थेट आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. आता रानूच्या धर्तीवर आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, या व्हिडीओनंतर बिहारचा सनी बाबा एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. हा सनी बाबा रस्त्यांवर गात भीक मागून पोट भरतो़ विशेष म्हणजे, तो इंग्लिश गाणी गातो.ट्विटरवर एका युजरने सनी बाबाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सनीबाबा काही लोकांशी बोलतोय. तुम्ही मला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारा, मी उत्तर देईल, असे तो म्हणतो. यानंतर एक व्यक्ति त्याला तुम्ही काय करता? असा प्रश्न करतो. यावर आय बेग अर्थात मी भीक मागतो, असे उत्तर सनी बाबा देतो.

 तुम्ही लंच व डिनरमध्ये काय खाता, या प्रश्नालाही सनी बाबा इंग्लिशमध्ये उत्तर देतो. व्हाट आलमाइटी गिव्स मी आय एम हॅपी विद दॅट (देव मला जे देतो त्यात मी आनंदी आहे.) असे तो म्हणतो. मला गाण्याचा आणि डान्सचा छंद असल्याचे सांगतो. यावर युजर सनी बाबा एखादे गाणे गाऊन दाखवण्याची विनंती करतो आणि सनी बाबा 60 च्या दशकातील लोकप्रिय सिंगर Jim Reeves चे 'He'll Have to Go' इंग्लिश गाणे ऐकवतो. सनी बाबाचे हे गाणे ऐकून सगळेच थक्क होतात.सध्या सनी बाबाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काही लोकांच्या मते, सनी बाबा कॅरेबियन वा आॅफ्रिकी आहे. काही मात्र इतक्या प्रतिभावान व्यक्तिवर भीक मागण्याची वेळ का यावी, याचा विचार करून दु:खी आहेत. 

टॅग्स :राणू मंडल