आर. के. स्टुडिओनंतर आता सहा दशक जुने कमाल अमरोही स्टुडिओ बंद होणारेय. हा स्टुडिओ कमालिस्तान स्टुडिओ या नावानंही ओळखला जातो. या स्टुडिओत बॉलिवूडच्या कित्येक सिनेमांचं चित्रीकरण पार पडलंय. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, आर. के. स्टुडिओनंतर आता इथे देशातील सर्वात मोठं कॉर्पोरेट ऑफिस पार्क बनण्याची शक्यता आहे. यासाठी डीबी रिएलिटी व बंगळुरूतील आरएमझेड कॉर्पची संयुक्त व्यवहारासाठी बातचीत सुरू आहे. कमाल अमरोही स्टुडिओ पंधरा एकर जमिनीवर उभारलेला आहे.
कमालिस्तान स्टुडिओ हा दुसरा स्टुडिओ आहे जो कमर्शियल प्रॉपर्टी बनणारेय. मागील महिन्यात आर. के. स्टुडिओचा व्यवहार झाला होता. नुकतेच डीबी रिएल्टीने सांगितले की, कमालिस्तान के. प्रोडक्शन हाऊस महल पिक्चर्स आणि आरएमझेड यांच्यामध्ये व्यवहार झालाय ज्यात जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील जमिनीवर एक मोठं कॉर्पोरेट ऑफीस पार्क बनवले जाणारेय. या दोघांमध्ये झालेल्या व्यवहाराचे फायनेंशिएल डिटेल्स व डेव्हलपमेंट प्लानचा खुलासा झालेला नाहीये. मीडिया रिपोर्टनुसार, आरएमझेडचे ५५ टक्के व डीबी रिएलिटी आणि अविनाश भोसले ग्रुपला ४५ टक्के भागीदारी मिळणारेय. या प्रोजेक्टची किंमत २१ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जातंय.
कमालिस्तान स्टुडिओ पटकथा लेखक कमाल अमरोही यांनी १९५८ साली स्थापन केले होते. या स्टुडिओमध्ये कित्येक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. महल (१९४९), पाकिजा (१९७२), रजिया सुल्तान (१९८३), अमर अकबर अँथोनी व कालिया या चित्रपटांचा समावेश आहे. कमाल यांनी १५ एकर जमिनीवर हा स्टुडिओ उभारला होता. २०१० साली कमाल यांच्या तीन मुलांनी स्टुडिओचा एक हिस्सा तीन बिल्डरांना विकला होता. ज्यात डीबी रिएलिटी व अविनाश भोसले ग्रुपचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त द लुथरियासचा देखील खरेदीत समावेश होता. हा व्यवहार जवळपास दोनशे कोटींचा झाला होता. मागील महिन्यात मे मध्ये गोदरेज प्रॉपर्टीने आयकॉनिक आर के स्टुडिओचा व्यवहार केला होता. ७१ वर्षे जुना आरके स्टुडिओवर कंपनी व रिटेल संदर्भात योजना आखल्या जात आहेत.