Join us

सत्यमेव जयतेनंतर 'या' सिनेमाच्या प्लॉनिंगला लागला जॉन अब्राहम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 16:23 IST

सत्यमेव जयते नतंर जॉन अब्राहम लवकरच आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. जॉन नोव्हेंबरपासून बाटला हाऊस सिनेमाची सुरुवात करणार आहे.

ठळक मुद्देजॉन नोव्हेंबरपासून बाटला हाऊस सिनेमाची सुरुवात करणार आहेयाचे शूटिंग दिल्ली, मुंबई,जयपूर आणि नेपाळमध्ये होणार आहे.

सत्यमेव जयते नतंर जॉन अब्राहम लवकरच आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. जॉन नोव्हेंबरपासून बाटला हाऊस सिनेमाची सुरुवात करणार आहे. 'गली गुलियां'च्या स्क्रिनिंगच्या वेळेला तो प्रसार माध्यमांशी बोलत होता. 

जो म्हणाला, पुढच्या आठवड्यापासून बाटला हाऊससाठी वर्कशॉप सुरु करणार आहे. आम्ही नोव्हेंबरपासून सिनेमाचे शूटिंग सुरु करुन जानेवारीपर्यंत शूटिंग पूर्ण करणार आहे. आम्हाला यासिनेमासाठी खूप शोध करावा लागणार आहे. याचे शूटिंग दिल्ली, मुंबई,जयपूर आणि नेपाळमध्ये होणार आहे. जॉनच्या सत्यमेव जयतेने बॉक्स ऑफिसवर 90 कोटींचा कमाई केली.     

निखील अडवाणी दिग्दर्शित हा चित्रपट निखील अडवाणी, भूषण कुमार आणि स्वत: जॉन असे तिघे मिळून प्रोड्यूस करणार आहेत. १९ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीच्या जामिया नगरात इंडियन मुजाहिदीनच्या संदिग्ध अतिरेक्यांविरोधात मोहिम उघडण्यात आली होती. यात आतिफ अमीन व मोहम्मद साजिद या दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला होता. दोन अन्य अतिरेकी पळण्यात यशस्वी झाले होते. तर एकाला जिवंत अटक करण्यात आली होती. ही चकमक बटला हाऊस एन्काऊंटर म्हणून ओळखली जाते. जॉनच्या चित्रपटाची कथा याच चकमकीवर आधारित असेल. दिल्ली, जयपूर, लखनौ, मुंबई शिवाय नेपाळमध्ये या चित्रपटाचे शूटींग होईल. निखीलने या चित्रपटासाठी सर्वांत आधी सैफ अली खानशी संपर्क साधला होता. सैफला चित्रपटाची स्क्रिप्टही आवडली होती. पण काही कारणास्तव सैफने त्यास नकार दिला आणि हा चित्रपट जॉनच्या झोळीत पडला. 

टॅग्स :जॉन अब्राहमसत्यमेव जयते चित्रपट