मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायक - संगीतकार आणि दिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णींनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहून खास पोस्ट लिहीली आहे. सलील कुलकर्णी लिहीतात, "तुजसाठी मरण ते जनन. तुजवीण जनन ते मरण .. हे म्हणणारे आणि ते जगण्यात आचरणारे .. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर .. ह्यांच्यावरचा हा चित्रपट तुम्ही बघाच .. तुमच्या मुलांनाही दाखवा .. !!"सलील कुलकर्णी पुढे लिहीतात, "एक महाकवी , एक प्रखर बुद्धिमत्ता असणारे नाटककार .. आणि स्वतःच्या घरावर निखारे ठेवणारे एक क्रांतिकारक .. विनायक दामोदर सावरकर .. अशा व्यक्तीवर प्रत्येक पिढीने कलाकृती करावी आणि पुढच्या पिढीला दाखवावी आणि तरीही संपूर्णपणे आपल्याला मांडता येणार नाही अशी ही सूर्यासारखी तेजस्वी व्यक्ती .. आज चित्रपट पाहताना, पुन्हा पुन्हा जाणवलं कि पुढच्या पिढीला सावरकर कळण्यासाठी पुस्तकं , नाटक , चित्रपट अश्या जेवढ्या माध्यमातून त्यांचे विचार आणि साहित्य मांडता येईल तेवढे मांडायला हवे . आपल्या देशांत जे महाकवी होऊन गेले त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर ह्यात कोणत्याही मराठी भाषा कळणाऱ्या माणसाला शंका असणार नाही ."
"सूर्यासारखी तेजस्वी व्यक्ती पुढच्या पिढीला कळण्यासाठी..."; 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून डॉ. सलील कुलकर्णींची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 3:35 PM