Join us

"सुशांतच्या मृत्यूनंतर मला चीड आली होती; ४ वेळा सुसाईडचा प्रयत्नही केला होता" 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 9:23 AM

अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकणारा अभिनेता अमित साधच्या मनात येणाऱ्या विचारांनी चाहत्यांनाही शॉक बसला असेल

मुंबई - २०२० मध्ये झालेल्या बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांना धक्का बसला. सुशांतच्या अचानक जाण्यानं त्याचा सहकलाकार अमित साधही या धक्क्यातून सावरला नाही. सुशांतच्या मृत्यूनं त्याच्या मनावर वाईट परिणाम झाला. या घटनेनंतर अमितनं फिल्म इंडस्ट्री सोडण्याचं ठरवलं होतं. इतकेच नाही तर आतापर्यंत ४ वेळा सुसाईड करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासाही अमित साधनं केला. 

अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकणारा अभिनेता अमित साधच्या मनात येणाऱ्या विचारांनी चाहत्यांनाही शॉक बसला असेल. अमित साधला या स्थितितून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी मदत केली. चेतन भगतच्या पॉडकास्टमध्ये अमितने शॉकिंग खुलासे केलेत. त्याचसोबत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर काय झालं ते सांगितले. 

अमित साधला इंडस्ट्री सोडण्याचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला की, मला चीड आली होती. ही इंडस्ट्री खूप कठीण आहे. सुशांत मृत्यूच्या ३-४ महिने आधी मी अशा व्यक्तीशी बोललो होतो जो सुशांतला ओळखत होता. त्याच्याकडून सुशांतचा नंबर मागितला. मला सुशांतशी बोलायचं. पण माझ्याकडे नंबर नाही असं मी म्हटलं. त्या व्यक्तीनं मला सांगितले की, सुशांत स्वत: पूर्णपणे लोकांपासून दूर जातोय. त्याने त्याचा नंबरही बदलला आहे. त्यानंतर मी विचार केला सुशांतच्या घरी जाऊ. परंतु त्याने मला नकार दिला. माझ्या मनात सुशांतला न भेटल्याची खंत आहे. अमित साधनं सुशांत आणि राजकुमार राव यांच्यासोबत काई पो चे या सिनेमात काम केले होते. 

स्मृती इराणी यांनी विचार बदलला अमित साधने सांगितले की, जेव्हा मी मानसिक तणावाखाली होतो तेव्हा स्मृती इराणी यांनी मदत केली. मी अडचणीत आहे हे त्यांना कसं माहिती पडलं माहिती नाही. मला त्यांचा फोन आला. त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. त्यांनी माझ्याशी संवाद साधला. ६ तास आमचं बोलणं झाले. मला इंडस्ट्रीत काम करायचं नाही मी एकटा जाऊन पहाडात राहेन असं मी म्हटलं. त्यावर स्मृती इराणी यांनी मला समजावलं. स्मृती इराणी माझ्या परिस्थितीबाबत कायम फोनवरून माहिती घेत असे. 

४ वेळा सुसाईडचा प्रयत्नचेतन भगत यांच्या पॉडकास्टमध्ये अमितनं खुलासा केला की, भूतकाळात मी ४ वेळा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझं वय १६-१८ वर्ष असेल. अमितच्या अनुभवावरून सुसाईड करणाऱ्याच्या मनात नेमकं काय सुरू असतं हे माहिती आहे. अमित आता स्वत:ला स्ट्रॉंग मानतो. आता आयुष्य खूप बदललंय आणि चांगले जीवन सुरू आहे असं तो म्हणाला.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअमित संध