Join us

वाजिद खाननंतर आईचीही कोरोना टेस्ट आली पॉझिटिव्ह, कालच त्याने घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 10:10 IST

वाजिद खान यांची आई रजिया खान यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचा किडनी व कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. यातच वाजिद खान यांची आई रजिया खान यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे.वाजिद खान यांच्या आईला चेंबूर येथील सुराना सेतिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सजिद खान यांच्या आईची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. साजिद यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची देखरेख करण्यासाठी रजिया खान तेथेच थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे.  वयाच्या 42 व्या वर्षी वाजिद यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून वाजिद आजारी होते. चेंबूरमधील सुराना रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी वाजिद खान यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

1998 मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत देऊन आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर सलमान खानच्या गर्व, तेरे नाम, पार्टनर, दबंग यांसारख्या चित्रपटांची त्यांनी गाणी लिहिली, गायली आणि संगीतही दिले. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमान खानचे ‘प्यार करोना’ आणि ‘भाई भाई’ गाणेही साजिद-वाजिद जोडीने संगीतबद्ध केले होते. वाजिद यांचे ते शेवटचे गाणे ठरले.

टॅग्स :वाजिदसाजिद खान