Join us

सुश्मिता सेनचा ३० वर्ष जुना Video, ताजमहालसमोर फोटोशूटदरम्यान बेशुद्ध पडलेली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 7:30 PM

मिस युनिव्हर्स फोटोशूटदरम्यान घडलेली घटना

अभिनेत्री सुश्मिता सेनने (Sushmita Sen) १९९४ साली मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला होता. यानंतर तिचं आग्र्याच्या ताज महालसमोर आयकॉनिक फोटोशूटही झालं होतं. सेलिब्रिटी डिझायनर रितू कुमारने नुकतंच एक व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. व्हिडिओमध्ये सुश्मिता सेनचीही झलक दिसते. दरम्यान त्यावेळी सुश्मिता बेशुद्ध झाल्याचाही किस्सा तिने शेअर केला आहे. काय आहे रितू कुमारची पोस्ट बघा.

रितू कुमारची सोशल मीडिया पोस्ट

1993 मध्ये मी मिस इंडियाच्या स्पर्धकांसाठी कॉस्च्युम डिझाईन केले. 1994 मध्ये सुश्मिता सेनने मिस इंडिया आणि नंतर अमेरिकेत मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला. हा ऐतिहासिक क्षण होता आणि मी याचा भाग होते याचा मला खूप आनंद आहे. मिस इंडियाच्या टीमसोबत काम करताना मला सुश्मिताचं वॉडरोब बनवण्याचंही काम मिळालं होतं कारण ती अमेरिकाच्या दौऱ्यावर होती. मी तिला बांधणी आणि जरदोजी, कुर्ता पायजमा आणि साड्या पाठवल्या. दौऱ्यानंतर ती दिल्लीत परतली तेव्हा मला ताजमहालजवळ ये असा निरोप मिळाला. तिथे पोहोचल्यावर मला कळलं की टीमने ताजमहालसमोर फोटोशूट करण्याचा प्लॅन बनवला आहे. पण तिला मिळालेले कपडे शॉर्ट्स आणि टीशर्ट्स होते. ऐतिहासिक स्थळासमोर असे कपडे शोभणारे नव्हते. मग आम्ही रात्री एका दुकानातून गुलाबी साडीसोबत एक ब्लाऊजही तयार केला. इतरही महत्वाच्या गरजेच्या गोष्टी आम्हाला मिळाल्या.काही तासातच आम्ही शूटसाठी तयार झालो. शूटिंगच्या शेड्युलमुळे बिचारी सुश्मिता एकदा चक्कर येऊन पडली. तरी  तिचे फोटो खूपच सुंदर आले होते. आजही ती गुलाबी साडीमधली सुश्मिता डोळ्यासमोर येते आणि आमच्या सभोवताली असलेले युपी पोलिसही अभिमानाने टाळ्या  वाजवत होते. यानंतर ते फोटो सगळ्या पब्लिकेशनमध्ये छापून आले ज्याचं श्रेय आम्हालाही मिळालं होतं."

सुश्मिता सेनचा हा व्हिडिओ 90 च्या दशकात घेऊन जाणारा आहे. त्यात तिचं सौंदर्य, चेहऱ्यावरची निरागसता सगळंच खूप अप्रतिम दिसतंय. सुश्मिताने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानंतर अभिनयात पदार्पण केलं. 'बीवी नंबर 1',मै हूँ ना','मैने प्यार क्यू किया' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं.

टॅग्स :सुश्मिता सेनताजमहालमिस युनिव्हर्सव्हायरल फोटोज्सोशल मीडिया