मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर(Saie Tamhankar )ने अबुधाबी येथे झालेल्या 22 वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच आयफा पुरस्कार सोहळ्यात (IIFA awards 2022) आयफा पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.
यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन हिने आपल्या नावावर केला. ‘मिमी’ या चित्रपटासाठी तिला या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. याच चित्रपटासाठी सईनं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला.
आता सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई पार्टीसाठी तयार झालेली दिसतेय. पार्टी तो बनती है असं कॅप्शन तिने या फोटोंसोबत दिलं आहे. त्यानंतर ही चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. सई ही मच्छरदानी कुठे मिळते, माझी मच्छरदानी चोरली हिने, मिंट सांगली च्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील अशा कमेंट्स चाहते तिच्या या फोटोंवर करतायेत. तर काही चाहते तिचे कौतुकदेखील करतायेत.
गतवर्षी ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘मिमी’ हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. क्रितीच्या कामाचं कौतुक झालं होतं. शिवाय या चित्रपटातील मराठमोळ्या सईचा अभिनय पाहूनही प्रेक्षक सुखावले होते. यात सईने क्रितीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. क्रिती एका विदेशी जोडप्यासाठी सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेते आणि यानंतर तिचं अख्ख आयुष्य बदलतं, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात क्रिती व सईशिवाय पंकज त्रिपाठी, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक, एव्हलिन एडवर्ड्स, एडन व्हायटॉक सहाय्यक भूमिकेत आहेत.