अभिनेता चेतन हंसराज पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. 'चंद्र -नंदिनी' या मालिकेत तो पर्वतक मलयकेतूची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा चेतन हंसराज रजत टोकसच्या विरोधात भूमिका साकारणार आहे. चंद्र-नंदिनी मालिकेत ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सूक असून, ही भूमिकाही खूप गुंतागुंतीची आणि मनाला समाधान मिळवून देणारी आहे. रजत टोकसबरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळाल्याचाही आनंद असल्याचे चेतन हंसराजने म्हटले आहे.
पुन्हा एकदा चेतन हंसराज विरोधी भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 2:15 AM