Join us

"ज्वाला में जो जीते है वो.."; सई ताम्हणकर-जितेंद्र जोशीच्या 'अग्नी' सिनेमाचा थरारक ट्रेलर, या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 16:38 IST

बहुचर्चित 'अग्नी' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झालाय. विशेष म्हणजे सिनेमा हिंदी असला तरीही सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे

गेल्या काही दिवसांपासून एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. त्या सिनेमाचं नाव 'अग्नी'. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर रिलीज झाला तेव्हापासून सिनेमाच्या ट्रेलरची उत्कंठा शिगेला होती. अखेर आज मुंबईत 'अग्नी'चा ट्रेलर लॉंच करण्यात आला. विशेष म्हणजे 'अग्नी' सिनेमा जरी हिंदी भाषेत असला तरीही या सिनेमात मराठी कलाकारांची फौज दिसतेय. अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची हृदयस्पर्शी कहाणी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.

'अग्नी' सिनेमाचा ट्रेलर

'अग्नी' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला दिसतं की, परळ अग्निशमन केंद्रात शाळकरी मुलांना फायर ब्रिगेड संदर्भात माहिती दिली जाते. त्यानंतर एका मराठी कुटुंबाची कहाणी दिसते. त्या कुटुंबातील अधिकारी (प्रतीक गांधी) अग्निशमन दलामध्ये असते. त्याची बायको (सई ताम्हणकर) त्याच्याशी पोलीस दलातील त्यांच्या नातवाईकाबद्दल बोलताना दिसते. पुढे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत द्विवेंदूची एन्ट्री होताना दिसते. एकूणच ट्रेलरमध्ये अग्निशमन आणि पोलीस दलाचा संघर्ष दिसतो. शिवाय अग्निशमन दलातील अधिकारी आयुष्य अन् नोकरीशी कसे झगडतात, याचीही करुण कहाणी पाहायला मिळते.

'अग्नी' कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'अग्नी' सिनेमा रिलीज होणार आहे. ६ डिसेंबरला घरबसल्या तुम्हाला हा सिनेमा पाहायला मिळेल. या सिनेमात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, सखी गोखले, जयवंत वाडकर या मराठी कलाकारांची खास भूमिका आहे. याशिवाय प्रतीक गांधी, द्विवेंदू शर्मा, सय्यामी खेर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. शाहरुख खानच्या गाजलेल्या 'रईस' सिनेमाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून फरहान अख्तरने निर्मिती केलीय.

टॅग्स :सई ताम्हणकरजितेंद्र जोशीजयवंत वाडकरसखी गोखले