अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे मनोरंजन विश्वातील चर्चेतील कपल. या दोघांनी २० एप्रिल २००७ ला एकमेकांशी लग्नगाठ बांधली. दोघंही आपापल्या कामात सध्या व्यस्त आहेत. सध्या अभिषेक एकामागून एक बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग करतोय. तर ऐश्वर्या सध्या अभिनयापासून काहीशी दूर असली तरीही जगभरातील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना दिसते. अशातच व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले.
ऐश्वर्या - अभिषेकचा फोटो व्हायरल
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या पती-पत्नीचा सेल्फी फोटो व्हायरल झालाय. हा फोटो दिसताच चाहत्यांनी पसंती दिलीय. पेशाने व्यावसायिक आणि फिल्म प्रोड्यूसर असलेल्या अनु रंजनने हा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. हा सेल्फी फोटो ऐश्वर्या राय बच्चनने काढला असून या फोटोत अनु, अभिषेक आणि ऐश्वर्याची आई वृंदा राय दिसत आहेत. गुरुवारी रात्री एका लग्नसोहळ्यातील इव्हेंटमध्ये अभिषेक - ऐश्वर्या एकत्र आलेले दिसले. चाहत्यांनी दोघांच्या या सेल्फी फोटोला चांगलीच पसंती दिलीय.
ऐश्वर्या - अभिषेकचा एकमेकांना मॅचिंग ड्रेस
ऐश्वर्या - अभिषेकने एकमेकांना मॅचिंग असा काळ्या रंगाचा एथनिक आउटफिट परिधान केलाय. दोघांचा जोडा खूप छान दिसतोय. या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. अभिषेक-ऐश्वर्या 'रावण' सिनेमानंतर पुन्हा एकदा मणी रत्नमच्या सिनेमात एकत्र काम करणार आहेत. नुकताच अभिषेकचा 'आय वॉन्ट टू टॉक' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमानंतर अभिषेक सध्या 'हाउसफुल्ल 5' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.