बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अशातच ऐश्वर्या हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
ऐश्वर्या राय तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय आता या जगात नाहीत. आठ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त ऐश्वर्याने त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. कृष्णराज राय यांचे फोटो शेअर करताना तिनं लिहलं, "प्रिय बाबा-अज्जा, मी नेहमीच तुम्हाला मनापासून प्रेम करत राहील. मला कायम तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मिळतं, यासाठी खूप खूप धन्यवाद". चाहते अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
ऐश्वर्या राय यांचे वडील कृष्णराज राय यांचे २०१७ मध्ये निधन झालं होतं. ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तिनं २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ती शेवटची मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन पार्ट २' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटासाठी, तिला दुबईतील साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता.