अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) यांचा 'जोधा अकबर' (Jodhaa Akbar) हा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्तम ऐतिहासिक सिनेमांपैकी एक असा हा सिनेमा. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. हृतिक आणि ऐश्वर्या रायच्याा अभिनयासह हा सिनेमा त्यांच्या भरजरी कॉस्ट्यूममुळे, दिमाखदार सेटमुळे चर्चेत होता. या चित्रपटात ऐश्वर्या राय खूपच सुंदर दिसत होती. या सिनेमात तिने एक लाल रंगाचा आयकॉनिक लेहेंगा परिधान केला होता. जो डिझायनर नीता लुल्लाने तयार केला होता. आता हा लेहेंगा थेट ऑस्करमध्ये (Oscars ) पोहचला आहे.
'जोधा अकबर' सिनेमात ऐश्वर्यानं परिधान केलेला हा लेहेंगा ऑस्कर म्युझियमने (Academy Museum) आपल्या आगामी प्रदर्शनासाठी ठेवला आहे. प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारांसाठी प्रसिद्ध असलेल्या अकादमीने ही माहिती शेअर केली आहे. अकादमीने आपल्या इंस्टाग्राम पेजवर ऐश्वर्या रायचा हा लूक शेअर केला आहे.
व्हिडीओ शेअर करताना अकादमीने लिहिलं की, "हा लेहेंगा एका राणीसाठी शोभतो, जो सिल्व्हर स्क्रीनसाठी डिझाइन करण्यात आला होता. हिरे आणि रत्नांनी बनलेला हा लेहेंगा जोधा अकबर (2008) मध्ये अकबरसोबतच्या लग्नात (Bridal Lehenga ) जोधानं अर्थात ऐश्वर्यानं परिधान केला होता. हा लेहेंगा एक जुनी कला प्रतिबिंबित करता. या लेहेंग्यावर एक कोरलेला एक मोरही दिसेल, जो भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. हा फक्त एक पोषाक नसून भारताच्या वारशाचं प्रतिक आहे.