विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन मागील काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातं आहे. पण, यावर अभिषेक, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच आता एका व्हिडीओ समोर आला आहे, ज्यानं या घटस्फोटाच्या चर्चांना खतपाणी घातल्याचं दिसतंय.
नुकतंच ऐश्वर्या ही दुबईतील 'ग्लोबल वुमेन फोरम' या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. महिला सशक्तीकरणासाठी आयोजित या कार्यक्रमात ऐश्वर्या निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर सुंदर असं जॅकेट घातल्याने तिच्या लूकमध्ये अधिकच भर पडली. या कार्यक्रमात ऐश्वर्या मंचावर येताच मोठ्या स्क्रीनवर तिचं नाव झळकलं. पण, यावेळी त्यात बच्चन हे आडनाव नव्हतं. 'ऐश्वर्या राय' व 'इंटरनॅशनल स्टार' असं नाव स्क्रीनवर दिसलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. स्क्रीनवर 'बच्चन' आडनाव न झळकल्याने तिने ते हटवल्याची चर्चा आहे.
17 वर्षांपूर्वी अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्यानंतर ऐश्वर्या रायने तिच्या नावात अभिषेकचे आडनाव जोडले होते. तेव्हापासून ती ऐश्वर्या राय बच्चन म्हणून ओळखली जाते. सोशल मीडिया अकाउंटवरही ऐश्वर्याने तिचे नाव ऐश्वर्या राय बच्चन असे लिहिले आहे. मात्र, दुबईहून आलेल्या या व्हिडिओमध्ये 'बच्चन' हे नाव न दिसणे, हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे. ही केवळ चूक होती की जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय हे अद्याप उघड झालेले नाही.
अलीकडेच 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिषेक बच्चन याने घरी राहून लेक आराध्याची काळजी घेण्याबाबत कॅमेऱ्यासमोर ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. या मुलाखतीत अभिषेकने मुलांसाठी आईला करिअर सोडावं लागतं. तर वडील कुटुंबासाठी काम करतात, असं भाष्य केलं.