Join us

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या बच्चनचीच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:39 IST

सध्या सोशल मीडियावर आराध्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक व्यक्ती ही  ऐश्वर्याच्या लाडक्या लेकीचं कौतुक करत आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya rai) हिची सोशल मीडियावर कायमच चर्चा होते.  ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनदेखील कायम लाइमलाइटमध्ये असते. ऐश्वर्या कोणत्याही पुरस्कार सोहळा, विदेश दौऱ्यावर गेल्यानंतर कायम आराध्याला तिच्यासोबत घेऊन जाते. आता सध्या सोशल मीडियावर आराध्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक व्यक्ती ही  ऐश्वर्याच्या लाडक्या लेकीचं कौतुक करत आहेत. 

नुकतंच दुबईमध्ये नुकताच दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (SIIMA) सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिच्या लेकीने लक्ष वेधून घेतलं. या सोहळ्यासाठीही मायलेकी एकत्र आल्या होत्या. यावेळी आराध्याच्या एका कृतीच नेटकऱ्यांकडून जोरदार कौतुक होत आहे. 

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, अभिनेता शिवा राजकुमार आणि चियान विक्रमची भेट घेण्यासाठी ऐश्वर्या आराध्याला घेऊन जाते. अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिने प्रथम त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. अभिनेता शिवाने देखील आराध्याला आशीवार्द दिले. आराध्याचा हा नम्रपणा पाहून ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरही अभिमानाचे भाव पाहायला मिळाले. तर आराध्याचे संस्कार पाहून नेटकरीसुद्धा तिचं कौतुक करत आहेत. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूड