सध्याच्या काळात सोशल मीडियावर अनेकदा बॉलिवूड स्टार्सपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजे स्टारकिड्सचीच सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते. यात खासकरुन करीना कपूर (kareena kapoor-khan) खानचा लेक तैमुर आणि ऐश्वर्या राय बच्चनची (aishwarya rai) लेक आराध्या (aaradhya bachchan) हे दोन स्टार किड्स कायम नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असतात. यात आराध्या अनेकदा तिच्या शांत स्वभावामुळे आणि तिच्या दडलेल्या टॅलेंटमुळे चर्चेत येत असते. यावेळीदेखील तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या सुस्पष्टपणे शुद्ध हिंदी बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आराध्यावर आणि बच्चन कुटुंबाने केलेल्या संस्कारांवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर आराध्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या तिच्या शाळेतील एका कार्यक्रमासाठी कविता सादर करताना दिसत आहे. त्यामुळे तिने शाळेचा ड्रेसही परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या कोणतीही भाषा जर सहज शिकायची असेल तर ती कवितेच्या माध्यमातून शिका असा संदेश देत आहे.
दरम्यान, आराध्याचं हिंदी ऐकल्यावर अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचं हिंदी साऱ्यांनाच ठावूक आहे. हिंदी भाषेवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांनी आराध्यालादेखील उत्तमरित्या हिंदी शिकवलं आहे असं म्हणत अनेक जण बिग बींचंही कौतुक करत आहेत. तसंच ऐश्वर्यानेही लेकीवर चांगले संस्कार केले आहेत, असं अनेकांचं म्हणणं आहे.