बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातं होतं. पण, यावर अभिषेक, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. अशातच आता ऐश्वर्या रायने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. पती अभिषेक याचा बालपणीचा एक गोड फोटो तिनं शेअर केलाय. या पोस्टला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अभिषेकसाठी खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्यानं अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काल अभिषेकचा ४९वा वाढदिवस होता. या खास निमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. चाहतेच नव्हे तर, मनोरंजन विश्वातील कलाकार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी देखील अभिषेक बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्या राय बच्चन हिनेही पती अभिषेकसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी खास पोस्ट शेअर केली.
ऐश्वर्यानं अभिषेकचा बालपणीचा फोटो शेअर करत लिहलं, "तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि भरभराट होऊदे हीच देवाकडे प्रार्थना.' ऐश्वर्याच्या या पोस्टने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विश्वसुंदरीच्या या पोस्टमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागलाय. जवळपास अडीच महिन्यानंतर ऐश्वर्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामुळं तिच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. दरम्यान, ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले. लग्नाच्या चार वर्षानंतर म्हणजेच २०११ मध्ये या जोडप्याला आराध्या ही मुलगी झाली. आराध्यादेखील कायम चाहत्याचं लक्ष वेधून घेत असते.