Aishwarya-Abhishek Bachchan Celebrate 18th Anniversary: विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्यासाठी आणि निळ्याशार डोळ्यांसाठी ओळखली जाते. बॉलिवूडमधील अग्रगण्य अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्याचं नाव सर्वात पुढं घेतलं जातं. जगभरात तिचा चाहतावर्ग आहे. ऐश्वर्याच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात. ऐश्वर्याच्या सोशल मीडियावर त्यांचं कायम लक्ष असतं. तिचे नवनवीन फोटो पाहण्यासाठी आसुसलेले असतात. ऐश्वर्या मात्र सोशळ मीडियावर जास्त सक्रीय नसते. ती फारच काही खास असेल तर पोस्ट करताना दिसून येते. आताही ऐश्वर्या काल तिच्या खास दिवशी एक फोटो पोस्ट केलाय.
काल ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या यांच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत. २० एप्रिल २००७ रोजी मुंबईत दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. लग्नाच्या वाढदिवशी ऐश्वर्यानं पती अभिषेक बच्चन व लेक आराध्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत होत्या. याच दरम्यान, या जोडप्याला एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.
फिल्मी स्टार्स कायमच खासगी आयुष्याबद्दल बोलणे टाळत असतात. मात्र ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं आयुष्य सुरुवातीपासूनच लाइमलाइटमध्ये राहिलं. लग्नापूर्वी ऐश्वर्याचे सलमान खान आणि विवेक ओबरॉय यांच्यासोबत नाव जुळलं होतं. तर अभिषेकचेही राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत सुत जुळल्याची चर्चा होती. अभिषेकचा करिश्मा कपूरसोबत साखरपुडादेखील झाला होता, मात्र काही कारणास्तव त्यांचे नाते तिथेच तुटलं होतं.
त्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात ऐश्वर्या आली. अभिषेकने जानेवारी २००७ मध्ये झालेल्या 'गुरु' सिनेमाच्या प्रीमिअरनंतर हॉटेलच्या बालकनीमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. त्यानंतर प्रीमिअरहून परतल्यानंतर दोघांनी अमिताभ बच्चन यांच्या घरी १४ जानेवारी २००७ रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर २० एप्रिल २००७ रोजी दोघे लग्नाच्या बेडीत अडकले होते. लग्नाच्या तिन वर्षानंतर त्यांनी २०११ मध्ये मुलगी आराध्याला जन्म झाला. आराध्या १९ मार्च २०२५ रोजी १३ वर्षांची झाली आहे.