नवी दिल्ली- म्युझिक ही प्रत्येकाच्या आवडीची गोष्ट असते. खराब असलेला मूड चांगला करण्यासाठी, धकाधकीच्या दैनंदिनीतून मोकळीक मिळविण्यासाठी प्रत्येक जण गाणी ऐकवण्याचा पर्याय निवडतात. सीमेवर देशाचं संरक्षण करत असलेल्या जवानांना तणावातून मुक्त करण्यासाठी दिग्दर्शक नीरज पांडे पुढे सरसावले आहेत. नीरज पांडे यांनी बीएसएफच्या जवानांना 200 पोर्टेबल म्युझिक स्टिस्टम भेट दिले आहेत.
नीरज पांडे यांनी जवानांना दिलेल्या पोर्टेबर म्युझिक स्टिस्टममध्ये 500 गाणी आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी नेहमी लढणाऱ्या जवानांना रोजच्या ताणातून थोडफार मुक्त करण्यासाठी नीरज पांडे यांनी हे पाऊल उचललं आहे. अय्यारी, वेन्डसडे, स्पेशल 26, बेबी असे एकापेक्षा एक सिनेमे प्रेक्षकांना देणाऱ्या नीरज पांडे यांनी नुकतीच जैसलमेरला भेट दिली. तेथे त्यांनी बीएसएफच्या जवानांना म्युझिक सिस्टम दिले.
दरम्यान, नीरज पांडे दिग्दर्शित अय्यारी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. अय्यारी हा एक राजकीय थ्रिलर सिनेमा आहे. देशाच्या सुरक्षेशी निगडीत मुद्द्यांवर सिनेमा केंद्रीत आहे. सिनेमात मनोज वाजपेयी, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिका साकारली. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्राने आर्मी आॅफिसरची भूमिका साकारली होती.