अभिनेत्री काजोलची आई आणि अजय देवगणच्या सासूबाई तनुजा सध्या जाम चर्चेत आहेत. होय,त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 76 वर्षांच्या तनुजांचा एक वेगळाच अवतार यात पाहायला मिळतोय. होय, तनुजा यांची मुलगी तनीषा मुखर्जीने मंगळवारी तिचा 42 वा वाढदिवस साजरा केला. या बर्थ डे सेलिबे्रशनचे काही फोटो तनीषाने सोशल मीडियावर शेअर केलेत. यापैकी एका फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
होय, या फोटोत तनीषा व तिच्या मैत्रिणींसोबत तनुजा उभ्या आहेत. त्यांनी बिकिनी घातली आहे. तनुजा यांनी बिकिनीत एकापेक्षा एक मस्त पोज दिल्यात. केवळ इतकेच नाही तर लेकीसोबत आणि तिच्या मैत्रिणींसोबत धम्माल मस्तीही केली.
सध्या तनुजांच्या या लूकवर चाहते फिदा झालेत आहेत. या वयात आयुष्य जगण्याचा त्यांचा उल्हास बघून चाहत्यांनी तनुजांचे कौतुक केले आहे. 1950 साली बालकलाकार म्हणून तनुजा यांनी फिल्मी करिअर सुरु केले. 1960 मध्ये ‘छबीली’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्यांना खरे यश मिळाले ते 1961 मध्ये प्रदर्शित ‘हमारी याद आएगी’ या चित्रपटाद्वारे.
तनुजा त्यांच्या बिनधास्त अॅक्टिंगसाठी जशा ओळखल्या जात, तसाच त्यांचा स्वभावही बिनधास्त होता. सुरुवातीपासूनच प्रचंड चंचल आणि मौजमस्ती करणारी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाई. केवळ इतकेच नाही तर सेटवर त्या दाखवत असलेल्या नख-यांचीही त्याकाळी बरीच चर्चा होती. एकदा अशाच नख-यांमुळे तनुजा यांना दिग्दर्शकाने कानाखाली लावली होती. आजही तनुजा बिनधास्त आयुष्य जगतात. त्यांचे हे फोटो पाहून याची खात्री तुम्हाला पटली असेलच.