Join us

काजोलसोबत लग्नाआधी 'या' अभिनेत्रीला डेट करत होता अजय देवगण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 3:54 PM

सध्या सर्वत्र अजय आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण आता त्यांच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहेत. अजय सोशल मीडियावर देखील काजोल आणि कुटुंबावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतो.  बॉलिवूडचं एक परफेक्ट कपल म्हणून काजोल आणि अजय देवगण यांची ओळख आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण काजोलसोबत लग्न करण्याआधी अजय हा अन्य अभिनेत्रीला डेट करत होता. सध्या सर्वत्र अजय आणि त्याच्या  खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

अजय देवगणचे नाव त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. पण अजयचे पहिले प्रेम कोणती अभिनेत्री होती, हे तुम्हाला माहीत आहे का? अजयने काजोलशी लग्न केले असले तरी त्याआधी त्यानं काही अभिनेत्रींना डेट केलं होतं. सर्वांत पहिल्यांदा अजयचे नाव अभिनेत्री रवीना टंडन हिच्याशी जोडलं गेलं होतं. अजय आणि रवीना टंडन रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं.

अजय देवगण-रवीना टंडन यांनी एकत्र एक चित्रपट केला होता. यादरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. पण जेव्हा अजयने करिश्मासोबत त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. तेव्हा त्याने रवीनासोबतचे सर्व संबंध संपवले. रवीनाने अजयला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता, असेही म्हटले जाते. पण अजयने या सर्व गोष्टींना स्पष्टपणे नकार दिला होता. अजयनंतर अक्षय कुमारने रवीना टंडनच्या आयुष्यात प्रवेश केला होता. पण त्यांचे नातेही लवकरच संपुष्टात आले.

यानंतर 'गुंडाराज' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अजय आणि काजोल यांच्यामध्ये प्रेम बहरलं. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. यानंतर अजय आणि काजोल यांनी २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाची गोष्ट सर्वत्र कळल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. अजयने एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. त्याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

टॅग्स :अजय देवगणकाजोलरवीना टंडनकरिश्मा कपूरबॉलिवूड