ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ९ - सलमान खान, शाहरूख खान, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, वरुण धवन, सोनम कपूरनंतर झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात अभिनेता अजय देवगण आणि त्याची पत्नी अभिनेत्री काजोल हजेरी लावणार आहेत. दिवाळीत येणाऱ्या त्यांच्या शिवाय या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी ते येत आहेत. १७ किंवा १८ ऑक्टोबरला ते या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या वेळी अजय मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवाय चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजयने केली आहे; तसेच तो या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. बल्गेरिया आणि मसुरी येथे या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी तो करीत आहे. यासाठी काजोलच्या म्हणण्यावरुन अजयने चला हवा येऊ द्याचा मंच निवडला आहे. याबाबत अजय म्हणाला की, या कार्यक्रमात काजोलही माझ्यासोबत असेल. मला फारसे मराठी येत नसले तरी काजोलने मराठी शिकवले आहे. त्यामुळे मराठी बोलण्याचा प्रयत्न करीन. दिवाळीत शिवायसोबत करण जोहर दिग्दर्श आणि रणबीर, ऐश, अनुष्काच्या प्रमुख भुमीका असेला ऐ दिल है मुश्किल हा चित्रपटही प्रदर्षिद होत आहे.
अजय देवगण बोलणार मराठी....या कार्यक्रमात काजोलसह हजेरी
By admin | Published: October 09, 2016 9:27 AM