दिग्दर्शक नीरज पांडेने 'अ वेनसडे', 'स्पेशल २६' आणि 'बेबी'सारख्या चांगल्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. नीरज पांडे पहिल्यांदाच अजय देवगणसोबत काम करणार आहे. त्यांचा आगामी चित्रपट चाणक्यमध्ये अजय देवगण दिसणार आहे. हा चित्रपट चाणक्य यांच्या जीवनावर व शिक्षणावर आधारीत आहे. यात चाणक्यच्या भूमिकेत अजय देवगण दिसणार आहे.
'चाणक्य' चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात अजय देवगण डबल रोल निभावताना दिसणार आहे. यात आजच्या काळातील एक व्यक्ती असणार जो चाणक्यसारखा विचार आणि काम करतो. तो चाणक्यची जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व राजनितीचे सूत्र आजच्या काळात लागू करण्याचा प्रयत्न करतो. या व्यक्तीच्या भूमिकेत अजय दिसणार आहे. तर दुसऱ्या भूमिकेत अजय देवगण चाणक्यच्या रोलमध्ये दिसणार आहे. आजही जेव्हा तो व्यक्ती अडचणीत सापडतो तेव्हा तो चाणक्यला आठवतो. चाणक्य त्याला अडचणीतून बाहेर काढतो. यात लगे रहो मुन्नाभाई चित्रपटासारखे मुन्नाभाईला गांधी दिसतात तसे पाहायला मिळणार आहे.'चाणक्य' चित्रपटाच्या माध्यमातून वर्तमान व भूतकाळामध्ये साधर्म्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आधुनिक काळातील राजकारणही दाखवले जाणार आहे. अजय देवगण या चित्रपटात आणि नीरज पांडे यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. अजयचे म्हणणे आहे की त्याने नीरजचे काम बारकाईने पाहिले आहे आणि नीरजची कथा स्क्रीनवर सादर करण्याची पद्धत खूप चांगली आहे.अजय देवगणने २०१४ साली 'अॅक्शन जॅक्शन' चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता तो 'चाणक्य' चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. त्याला पुन्हा एकदा डबल रोलमध्ये रुपेरी पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.