सिनेमाची निवड करताना कलाकार हजारदा विचार करतात. स्क्रिप्ट आवडली तरच सिनेमा साईन करतात. आधी कलाकारांनी कथा ऐकवली जाते, भूमिकेबद्दल सांगितलं जातं. त्यानंतर सिनेमा करायचा की नाही, हा पूर्णपणे कलाकाराचा कॉल असतो. पण काही कलाकार याला अपवाद असतात. होय, एखाद्या विशिष्ट दिग्दर्शकाचा सिनेमा चालून आला की, हे कलाकार अगदी डोळे बंद करून सिनेमा साईन करतात. अजय देवगण (Ajay Devgn) त्यापैकीच एक. होय, रोहित शेट्टीच्या कोणत्याही सिनेमाचं स्क्रिप्ट अजय देवगण वाचत नाही. सिंघमच्या (Singham) वेळची स्टोरी तर खासच आहे. होय, बाॅलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत खुद्द रोहित शेट्टीने (Rohit Shetty) सिंघमच्या वेळची स्टोरी सांगितली होती.
काय म्हणाला होता रोहित शेट्टी...?अजय देवगण माझ्या कोणत्याही सिनेमाची स्क्रिप्ट वाचत नाही. गोलमाल या चित्रपटानंतर त्याने माझ्या सिनेमाख्या स्क्रिप्ट वाचणंच बंद केलं. त्याने फक्त सिंघमची स्क्रिप्ट ऐकली होती. त्याने रात्री २ वाजता सिंघमची स्क्रिप्ट ऐकली आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ७ वाजता आम्ही गोव्यात शूटींग सुरू केलं. अजय रात्री 10 वाजता लंडनहून परत आला होता. पोलिसाची भूमिका होती म्हणून त्यानं लगेच केस कापले आणि ड्रेस ट्रायल दिली. कॉस्ट्यूम ट्रायलसाठी थोडा वेळ लागला तोवर रात्रीचे 12 वाजते होते. त्यानंतर आम्ही नरेशन सुरू केलं. रात्री 2 वाजता नरेशन पूर्ण झालं आणि सकाळी 7 वाजता आम्हाला शूट सुरू करायचं होतं. सिनेमाची कथा अजयला २.३० वाजता समजली आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता सेटवर हजर झाला. गोलमालनंतर तर त्याने माझ्या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकलीच नाही, असं रोहितने या मुलाखतीत सांगितलं होतं.
अजय देवगणचा रोहित शेट्टीवर, त्याच्या कामावर किती विश्वास आहे, हेच यावरून कळतं. रोहीत शेट्टीनं आतापर्यंत सर्कससह 15 सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. या 15 सिनेमांमधील 12 सिनेमांमध्ये अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे, हे त्यामागचं कारण आहे. रोहितच्या चेन्नई एक्सप्रेस, दिलवाले आणि सर्कस या फक्त ३ सिनेमांत अजय देवगण नाहीये.