बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण आणि ईशा देओल 'रुद्रा द एज ऑफ डार्कनेस' या वेबसीरिजमध्ये काम करणार आहेत. या सीरिजमधून ईशा आणि अजय डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहेत. यात ईशा अजयची पत्नी किंवा गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याने ट्विट केले की, 'ईशा देओल आणि अजय देवगण पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. ईशा देओल तख्तानी आणि अजय देवगण यांची जोडी रुद्र: द एज ऑफ डार्कनेस या वेबसीरीजमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. हे ब्रिटिश ड्रामा सीरीज लूथरचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.'
रुद्र: द एज ऑफ डार्कनेस या वेबसीरीजमधून ईशा आणि अजय डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहेत. यात ईशा अजयची पत्नी किंवा गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने दोघे १५ वर्षांनी पुन्हा एकत्र काम करणार आहेत.
ईशा देओलने याबाबत सांगितले की, 'बऱ्याच काळानंतर अजय देवगणसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तो बऱ्याच चित्रपटांमध्ये माझ्यासाठी उत्तम सहकलाकार होता. एक अभिनेता म्हणून मी त्या प्रोजेक्टवर काम करण्यावर विश्वास ठेवते जे मला काही नवे शोधू देतील. यासोबतच मला एक प्रेक्षक म्हणूनही जोडून घेईल. ही सीरीज एक ग्रे ओव्हरटोनसह पोलीस ड्राम्याचे एक नवे स्वरूप आहे जे याआधी हिंदीत पहायला मिळालेले नाही. ओटीटी माध्यमाच्या चमकदार यशासोबत मी या सीरीजद्वारे डिजिटल जगतात पदार्पण करण्यासाठी तयार आहे.'