National Film Awards : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा आज (30 सप्टेंबर) पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा’, तर अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ला ‘लोकप्रिय हिंदी सिनेमा’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच सोहळ्यात बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. अभिनेता अजय देवगण व साऊथ सुपरस्टार सूर्या यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा यावर्षी जुलै महिन्यात करण्यात आली होती. सन 2020 साठी हे पुरस्कार देण्यात आले. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे हा सोहळा लांबणीवर टाकण्यात आला होता. ‘तान्हाजी’ सिनेमाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या ओम राऊतने सांभाळली होती.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.
जाणून घ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी...
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा : तान्हाजीसर्वोत्कृष्ट अभिनेता : अजय देवगण (तान्हाजी), साऊथ स्टार सूर्या (सूराराई पोट्ट्रू)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अपर्णा बालमुरली, सूराराई पोट्ट्रूसर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: सूराराई पोट्ट्रूसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन केआर, अय्यप्पनम कोशियुमसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: बिजू मेनन, अय्यप्पनम कोशियमसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: लक्ष्मी प्रिया चंद्रमौली, शिवरंजनियुम इनम सिला पेंगलमसर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन पुरस्कार: एके अय्यप्पनम कोशियुमसर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: नाट्यम (तेलुगु)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मी वसंतरावसाठी राहुल देशपांडे आणि तक्तकसाठी अनिश मंगेश गोसावीसर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: नंचम्मा, अय्यप्पनम कोशियम सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजीसर्वोत्कृष्ट गीतकार : मनोज मुन्तशिर उल्लेखनीय फिचर फिल्म : जून (मराठी), गोदाकाठ (मराठी), अवांछित (मराठी)चित्रपटांसाठी अनुकूल राज्य : मध्यप्रदेशसर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी सिनेमा : अनिश गोसावी (टकटक), आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (सुमी)सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा : फनरल (मराठी)