चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगातील १८० पेक्षा जास्त देशांना विळख्यात घेतलं आहे. काही दिवसात जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाखांहून अधिक होणार असून या महामारीत मृत्यू झालेल्यांची संख्या ५० हजारांच्या वर पोहचणार आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींन पीएम केअर फंडला डोनेशन दिले आहे. बॉलिवूड सिंघम अजय दवेगणने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजला मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थेशी जवळपास 5 लाख लोक जोडली गेलेली आहेत. यातील बहुतेक लोक रोजंदरीवर काम करुन आपलं पोट भरतात. अजयने या लोकांसाठी 51 लाखांची आर्थिक मदत केली आहे. अजयसोबत रोहित शेट्टीने देखील 51 लाख डोनेट केले आहेत.
या संस्थेचे प्रमुख दिग्दर्शक अशोक पंडित यानी एक व्हिडीओच्या माध्यमातून दोघांचे आभार मानले. या व्हिडीओत ते म्हणाले आहेत की, प्रिय अजय देवगण, तू दिलेल्या 51 लाखांच्या मदतीसाठी तुझे आभार. तू वेळोवेळी मदत करुन हे दाखवून दिले आहेस की खऱ्या आयुष्यातही तू 'सिंघम' आहेस. देवाची कृपा तुझ्यावर नेहमीच असू देत. याचसोबत त्यांनी रोहित शेट्टीचे देखील आभार मानले आहेत.