Join us

"तिला मी हवा आहे पण...", तब्बू अविवाहित असण्यावर अजयने दिलेलं उत्तर, नंतर केलेली सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:15 IST

अनेक सिनेमांमध्ये एकत्र झळकलेल्या तब्बू आणि अजयची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही भन्नाट आहे.

अभिनेत्री तब्बू (Tabu) गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी आणि साऊथ सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सहज सुंदर अभिनय, साधा लूक, सौंदर्य यामुळे ती आजही चाहत्यांचं मन जिंकते. तब्बू ५३ वर्षांची आहे यावर कोणाचा विश्वासही बसत नाही. मात्र तरी ती आजपर्यंत अविवाहित आहे. तब्बूचे अजय देवगण, नागार्जुन यांच्यासोबत नाव जोडलं गेलं आहे. मात्र तिने अजूनही लग्न केलेलं नाही आणि तिचा लग्नाचा काही विचारही नाही. तब्बू अविवाहित असण्यामागचं कारण एकदा अजय देवगणनेच (Ajay Devgn) सांगितलं होतं. त्याचं उत्तर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

तब्बू आणि अजय देवगण ही सुपरहिट जोडी आहे. दोघांनी १० पेक्षा अधिक सिनेमात एकत्र काम केलं आहे. शिवाय दोघं खऱ्या आयुष्यात चांगले मित्र आहेत. तब्बूला अजय देवगण आजही आवडतो असंच त्यांच्या बाँडमधून दिसतं. त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही जबरदस्त आहे. एका जुन्या मुलाखतीत अजय देवगणने तब्बू अजून अविवाहित असण्यामागचं कारण सांगितलं होतं. तो गंमतीत म्हणालेला, "तब्बूला मी हवा आहे, पण ते होऊ शकत नाही." यानंतर दोघंही हसायला लागतात. पण अजय सारवासारव करत म्हणतो,"मला म्हणायचंय की माझ्यासारखा यार.पण माझ्यासारखा या जगात कोणी नाही." यानंतर तब्बू अजयच्या हातावर किस करत म्हणते,"नक्कीच, मला समजलं जान".

अजयच्या या विधानावर तब्बू पुढे म्हणते, "हा असा आहे म्हणून मला सहन करतोय. कोणी दुसरा असतता तर कदाचित वैतागला असता. तरी माझं तर लग्नही नाही झालं. तू तर लग्न केलं, मुलंही झाली." 

तब्बूने याआधीही एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "मी आणि अजय २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही एकाच कॉलनीत वाढलो. माझा चुलत भाऊ समीर आर्यच्या बाजूलाच अजय राहायचा आणि माझा जवळचा मित्र होता. माझ्याशी कधी कोणी मुलगा बोलायला आला तर अजय त्याला मारायचा. म्हणूनच कदाचित मी सिंगल आहे."

टॅग्स :अजय देवगणतब्बूबॉलिवूडरिलेशनशिपलग्न