काजोल(Kajol)ची शाहरुख खान(Shah Rukh Khan)सोबतची ऑनस्क्रीन जोडी सगळ्यांना आवडली असेल, पण 'सिंघम' अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) हा तिचा मिस्टर परफेक्ट आहे. काजोल आणि अजय देवगणने दिल क्या करे ते प्यार तो होना ही था आणि राजू चाचा पर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यापैकी एक चित्रपट म्हणजे 'इश्क', ज्यामध्ये अजय देवगण आणि काजोल व्यतिरिक्त आमिर खान आणि जुही चावला देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. नुकतेच २८ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाला रिलीज होऊन २६ वर्षे पूर्ण झाली.
'इश्क' चित्रपटाच्या सेटवर अजय देवगणने काजोलवर प्रेम व्यक्त केले आणि तिला प्रपोझ केले. त्याने काजोलला अंगठी घालायलाही लावली होती, पण यादरम्यान गोलमाल अभिनेत्याने एक चूक केली, ज्याबद्दल त्याने पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांना सांगितले. १९९७ मध्ये रिलीज झालेला 'इश्क' हा चित्रपट इंदर कुमारने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात आमिर खानसोबत जुही चावला आणि अजय देवगणसोबत काजोलची भूमिका होती. या चित्रपटालाही जबरदस्त यश मिळाले.
काजोलनं शेअर केली पोस्ट
आता नुकतेच काजोलने चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, तेव्हा अजय देवगणने तिच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना मजेशीर उत्तर दिले. काजोलची आठवण करून देत त्याने लिहिले, "हा तोच चित्रपट नाही का, जिथे मी तुला प्रपोज केले होते, तीही तुझी अंगठी घालून". अजय देवगणचे हे ट्विट वाचून सोशल मीडियावरील चाहत्यांना हसू आवरले नाही.
रोमँटिक-कॉमेडी चित्रपट इश्कला २६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, काजोलने एक पोस्टर शेअर केले आहे ज्यामध्ये चित्रपटाचे चारही कलाकार दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत काजोलने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना लिहिले की, “हा फोटो त्या दिवशी आम्ही स्वित्झर्लंडच्या टेकड्यांवर फिरलो होतो तेव्हा काढला होता. आम्ही किती थकलो होतो हे तुम्हाला दिसत नाही का आणि आम्ही विचार करत होतो की, 'सूर्य मावळायला इतका उशीर का झाला... आम्ही किती अप्रतिम कलाकार होतो ना?'. सेटवर प्रपोज केल्यानंतर दोन वर्षांनंतर, काजोल आणि अजय देवगण २४ फेब्रुवारी १९९९ रोजी विवाहबद्ध झाले. दोघेही आज बी टाऊनमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत.