बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) सोशल मीडियावर एका जाहिरातीमुळे खूपच चर्चा रंगली आहे. अक्षय कुमार पहिल्यांदा तंबाखू ब्रॅन्ड विमलच्या जाहिरातीत शाहरूख खान आणि अजय देवगणसोबत दिसला. तीन सुपरस्टार एकाच फ्रेममध्ये दिसल्याने ही जाहिरात व्हायरल झाली. यावरून त्यांना ट्रोलही खूप करण्यात आलं. तिन्ही स्टार्सपैकी सर्वात जास्त ट्रोलिंग अक्षय कुमारचं झालं.
तंबाखू ब्रॅन्डसोबत जाहिरात केल्याने अक्षय कुमारला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. प्रकरण पेटताना पाहून अक्षय कुमारने सोशल मीडियावरून माफीही मागितली. पण तरीही स्थिती अक्षय कुमारच्या बाजूने दिसत नाहीये. आता अक्षय कुमारच्या होत असलेल्या ट्रोलिंगवर अजय देवगनने (Ajay Devgn) प्रतिक्रिया दिली आहे. एका मीडिया पोर्टलसोबत बोलताना अजय देवगन म्हणाला की, एखाद्या वस्तू एंडोर्स करणं पर्सनल चॉइस आहे. प्रत्येकजण इतका परिपक्व आहे की, ते आपल्यासाठी निर्णय घेऊ शकतात.
अजय म्हणाला की, 'काही प्रॉडक्ट्स आहेत जे नुकसानकारक आहेत आणि काही असे आहेत जे नुकसानकारक नाहीयेत. मी नाव घेता हे सांगणार कारण मला ते प्रमोट करायचे नाहीयेत. मी वेलचीची जाहिरात करतो. मला वाटतं की, जाहिरातीपेक्षा, जर एखादी वस्तू चुकीची आहे तर ती विकली जाऊ नये.
काय म्हणाला अक्षय कुमार?
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने विमल वेलचीची जाहिरात करून स्वत:ला अडचणीत टाकलं. अक्षय कुमारने गुरूवारी सोशल मीडियावर त्याचा माफीनामा शेअर केला होता. ज्यात त्याने सर्वातआधी आपल्या फॅन्सची माफी मागितली. त्याने तंबाखूची जाहिरात सोडण्याचा निर्णय घेतला. अक्षय कुमार म्हणाला की, यातून मिळालेलं मानधन तो दान करणार आहे.