Join us

अजय देवगनच्या मेहुणीने गुपचूप उरकलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 12:43 PM

काजोलची (Kajol) बहीण असलेल्या तनिषाने 'शूssss' या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर 'नील एंड निक्की', 'सरकार राज', 'वन टू थ्री', 'टैंगो चार्ली' चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले.

हिंदी चित्रपटसृष्टीचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणची (Ajay Devgn) मेहुणी म्हणजेच अभिनेत्री तनिषा मुखर्जी (Tanishaa Mukerji ). रुपेरी पडद्यावर अपयशी ठरलेल्या तनिषाकडे सध्या कोणतेही चित्रपट नाहीत. मध्यंतरी ती बिग बॉसमध्ये झळकली होती. मात्र तिच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नाही. असं असलं तरी सध्या तनिषाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असते. तनिषा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या तनिषा  सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे तनिषाचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो तुम्हाला क्लीन बोल्ड करतील असेच आहेत.

तनिषाने पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. बिकीनी फोटोमुळे तनिषा मुखर्जी नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. तर दुसरीकडे तिच्या लग्नाच्याही चर्चा रंगत आहे. शेअर केलेल्या एका फोटोत तिने पायात जोडवे घातले आहेत. यावरच नेटीझन्सची नजर गेली आणि त्यांनी या फोटोंवर कमेंट करत वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. या फोटोमुळे सोशल मीडिया यूजर्सनी तनिषाने गुपचूप लग्न केल्याचा अंदाज लावला आहे. पायात जोडवे तेव्हाच घातले जातात जेव्हा महिला लग्न  करते. पायात जोडवे घातल्याचे पाहून नेटीझन्स तनिषाला शुभेच्छा देताना दिसतायेत.

 

त्याचवेळी काही लोकांनी कमेंट करताना विचारले आहे की, लग्न कधी केले? तर दुसरीकडे असे काही लोक आहेत ज्यांनी तनिषाचे पाय पाहून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काजोलची (Kajol) बहीण असलेल्या तनिषाने 'शूssss' या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर 'नील एंड निक्की', 'सरकार राज', 'वन टू थ्री', 'टैंगो चार्ली' चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले.

यानंतर 'बिग बॉस 7' ( Bigg Boss &) शोमध्ये तिच्या आणि अरमान मलिकच्या (Arman Malik) कथित रिलेशनशिपच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. मात्र अरमान आपला चांगला मित्र असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न तनिषाने केला. दोघांनीही जगासमोर आपलं नातं मान्य केलं होतं, पण काही काळानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.अखेर तनिषाचे लग्नाचे ‘अरमान’ अधुरेच राहिले.

टॅग्स :अजय देवगणकाजोल