Join us

Ajay Devgn: आमिर, अक्षयनंतर आता अजय देवगणवर भडकले नेटकरी, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 12:06 PM

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंड करतोय. हा ट्रेंड बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना महागात पडला. आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंड करतोय. हा ट्रेंड बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना महागात पडला. आमिर खान, अक्षय कुमारसारख्या बड्या स्टार्सला याचे परिणाम भोगावे लागले. आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सोशल मीडियावरच्या ‘बायकॉट’ गँगच्या निशाण्यावर आला आहे. अजयला बायकॉट करण्याची मागणी अनेकजण करताना दिसत आहेत. आता यामागचं कारण काय तर अजयचा आगामी सिनेमा ‘थँक गॉड’.होय, गेल्या 8 सप्टेंबरला अजय देवगणच्या ‘थँक गॉड’  (Thank God) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि हा ट्रेलर पाहून सोशल मीडिया युजर्स भडकले. अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) व रकुल प्रीत सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात अजय देवगण चित्रगुप्ताच्या  (Chitragupta) भूमिकेत आहे.

 सिद्धार्थ मल्होत्राचा अपघात होतो, त्यानंतर थेट चित्रगुप्ताच्या दरबारात त्याला त्याच्या कर्मांचा हिशोब  द्यावा लागतो, असं या चित्रपटाचं ढोबळ कथानक आहे. ट्रेलर बघता हा एक कॉमेडी सिनेमा असल्याचं दिसतंय. पण नेमकी या कॉमेडी चित्रपटातील एक गोष्ट नेटकऱ्यांना खटकली आहे. होय, चित्रपटात चित्रगुप्त बनलेला अजय देवगण हा पारंपरिक देवतांच्या रूपात नाही तर सूटाबुटात दाखवला आहे. अनेक तोकड्या कपड्यांतील तरूणी त्याच्यामागे उभ्या आहेत. चित्रपटात हिंदू देवीदेवतांना आधुनिक, मॉडर्न रूपात दाखवून त्यांची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप सोशल मीडिया युजर्स करत आहेत.

 ‘थँक गॉड’च्या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या काही दृश्यांमुळे सुद्धा सोशल मीडियावर या चित्रपटाला आणि अजय देवगणला बॉयकॉट करण्याची मागणी केली जातेय. चित्रगुप्त आणि हिंदू देव-देवतांची ज्यापद्धतीने या चित्रपटात खिल्ली उडवली गेली आहे त्यामुळे युजर्स संतापले आहेत.  

 ‘हिंदूंच्या नावावर आणि हिंदू देवांच्या नावावर अश्लीलता दाखवणं सुरू आहे ते बंद करा,’अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला आहे. ‘बॉलिवूड विनोदासाठी फक्त हिंदू देवी-देवताच दिसतात का?,’असा संतप्त सवाल एका युजरने केला आहे. ‘कुठपर्यंत आम्ही असा घाणेरडा अभिनय आणि मनोरंजन सहन करायचं?’, असा सवालही युजर्स करत आहेत.

अजयचा ‘थँक गॉड’ हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. इंद्रकुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

टॅग्स :अजय देवगणसिद्धार्थ मल्होत्राबॉलिवूडसोशल मीडिया