काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिची मुलगी न्यासाच्या १६ व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. बॉलिवूडमधील स्टार किड्स सुहाना खान, खुशी कपूर यांच्यासोबत अजय देवगण व काजोलची मुलगी न्यासादेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र नुकताच याबाबत काजोलने खुलासा केला आहे.
मुंबईत दादासाहेब फाळके एक्सेलेंस पुरस्कार सोहळ्यात काजोलने हजेरी लावली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी विचारले असता काजोलने सांगितले की, आता न्यासा फक्त १६ वर्षांची आहे. तिला मीडिया व लोकांपासून स्पेसची गरज आहे. सध्या ती १०वी इयत्तेत असून बोर्ड एक्झामची तयारी करते आहे.
काजोल मागील वर्षी हेलिकॉप्टर ईला सिनेमामध्ये झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता. काजोलने सांगितले की, सध्या अॅक्टिंग करण्याचा काहीही नियोजन नाही. कदाचित ती दोन वर्षांसाठी ब्रेक घेणार आहे. मात्र तिने काही प्लान्स आहेत, ज्याची घोषणा लवकरच ती करणार आहे.
काही दिवसांपूर्वी अजय देवगणने आपल्या कुटुंबाबद्दल सांगितले होते की, त्याची पत्नी काजोल व त्याची मुले स्टार्स आहेत. त्यामुळे लोकांची नजर स्टार्सवर असते. ज्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्याच नजरेतून मुलांकडे पाहणे योग्य नाही.
सध्या अजय देवगण आगामी चित्रपट दे दे प्यार देमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात मीटू चळवळी अंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप असलेले आलोकनाथदेखील झळकणार आहेत. त्यामुळे अजय देवगणवर तनुश्री दत्ताने निशाणा साधला होता.