‘शिवाय’ या आपल्याच बॅनरच्या चित्रपटातून अजय देवगण पुन्हा दिग्दर्शनाकडे वळत आहे. यापूर्वी २००८ या वर्षी त्याने ‘यू मी और हम’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. ‘शिवाय’च्या शूटिंगला डिसेंबरमध्ये प्रारंभ होणार आहे. रशियाची राजधानी असणाऱ्या मॉस्को शहरात शूटिंगचा पहिला टप्पा पार पडणार आहे. आपल्या चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून अजय हा हिरोईनची निवड करीत होता. पत्नी काजोल हिलाच ‘शिवाय’ची हिरोईन करण्याचा त्याचा विचार असल्याच्या वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या; परंतु अजयचा हिरोईनचा शोध अखेर संपला आहे. सायेशा सहगल या नव्या चेहऱ्याला अजय संधी देणार आहे. सायेशाची ‘स्क्रीन टेस्ट’देखील घेण्यात आली असून, अजय त्याबाबत समाधानी असल्याचे सूत्रांनी सांगितले. सायेशा ही ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांची भाची आहे. अभिनेता सुमित सहगल आणि शाहीन यांची ती मुलगी आहे.
अजयच्या चित्रपटातून सायराच्या भाचीची ‘एंट्री'
By admin | Published: September 11, 2014 2:05 AM