Join us

आकांशा साखरकरला मराठी चित्रपटानंतर करायचाय बॉलिवूडमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 7:00 PM

मराठमोळी अभिनेत्री आकांक्षा साखरकर हिने मराठी नाटक, चित्रपट व जाहिरातीत काम केल्यानंतर आता तिला बॉलिवूडचे वेध लागलेत.

मराठमोळी अभिनेत्री आकांक्षा साखरकर हिने मराठी नाटक, चित्रपट व जाहिरातीत काम केल्यानंतर आता तिला बॉलिवूडचे वेध लागलेत. तिने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आकांशा ही मूळची नागपूरची असून जवळपास तीन वर्षे ती मुंबईत राहत आहे. नाटकात तिने चार वर्ष काम केले आहे. त्याशिवाय तिने जाहिरातीत काम केले आहे. त्याच दरम्यान तिला ‘भला माणूस’ या मराठी चित्रपटाची ऑफर आली. या चित्रपटानंतर तिने ‘अंजना’ या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकरसोबत प्रमुख भूमिका साकारली होती.रॅम्प वॉकच्या शोसाठी तिने मॉडेल म्हणून काम केले आहे. वॉटर प्युरीफायर आणि मेट्रोमोनियलसाठी टेलिव्हिजनवरील जाहिराती देखील केल्या आहेत. तिने अनेक प्रचारात्मक व्हिडिओमधून आपली प्रतिभा दाखवली आहे. आकांशाने कलर्स मराठीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत अभिनय केला आहे आणि सध्या सोनी मराठीवरील ‘भेटी लागी जीवा’ या मालिकेत ‘स्वरा’ हे प्रमुख पात्र साकारत आहे. या मालिकेला मिळणाऱ्या यशामुळे उत्साही आणि आनंदी असणाऱ्या आकांशाने म्हटले की, “मालिकेला सोशल मिडीयावरुन प्रेक्षकांच्या खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. ज्या एपिसोडमध्ये मी दिसते त्या एपिसोडविषयी आणि माझ्याविषयी माझे चाहते कौतुक करतात. आणि जर कधी नाही दिसली तर त्यांचे सोशल मिडीयावर मेसेजेस येतात आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी कॉम्पलिमेंट आहे. खरं तर मालिकेचा हाच तर फायदा असतो की, दररोज मालिका घराघरांत पाहिली जाते, ज्या उलट चित्रपट एकदा प्रदर्शित होतो आणि तो थिएटरमधून एकदा का गेला की त्याला लगेच नाही पाहू शकत.”पण सध्या आकांशाचे संपूर्ण लक्ष हे चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या इच्छेवर आहे. जरी बॉलिवूडमध्ये तिची जाण्याची इच्छा असली तरी  मराठी ही मातृभाषा असल्यामुळे तिला मराठी सिनेसृष्टी सोडायची नाही. प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांना ती रोल मॉडेल्स मानते आणि याविषयी बोलताना तिने म्हटले की, “मला आयुष्यात खूप काही करायचे असे जेव्हा मनात येते तेव्हा मला प्रियंका चोप्राची आठवण येते. या इंडस्ट्रीतील प्रियाकांचा प्रवास पाहिला तर मी दंग होऊन जाते, तिच्याकडून प्रेरणा पण मिळते की ती कुठे होती आणि आता कुठे पोहचली. दीपिका पादुकोण पण माझी फेव्हरेट आहे, मी तिला फॉलो करते.” 

टॅग्स :चिन्मय उद्गगिरकर