बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चांगल्या सिनेमाच्या ऑफर्स धुडकावल्या आणि तेच सिनेमा सुपरहिट झाले. सिनेमाची कथा न आवडल्यामुळे, जास्त स्क्रीन न मिळाल्यामुळे किंवा अन्य कितीतरी कारणांमुळे अमिताभ बच्चन, शाहरुख खान (shahrukh khan), सलमान खान (salman khan), अजय देवगण (ajay devgn), अक्षय कुमार (akshay kumar) अशा कितीतरी कलाकारांनी चांगले सिनेमा गमावले आहेत. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांनी हे सिनेमा नाकारल्यामुळे अन्य काही कलाकारांचं नशीब चांगलं उजळलं. बॉलिवूडमध्ये असाच एक अभिनेता आहे ज्याने सुपरस्टार्सने नाकारलेला सिनेमा स्वीकारला आणि आज तो बॉलिवूडचा स्टार झाला आहे.
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेला 'बाजीगर' सिनेमा साऱ्यांनाच ठावूक आहे. बॉलिवूडच्या इतिहासात हा सिनेमा लोकप्रिय चित्रपट म्हणून ओळखला जातो. या सिनेमात अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकला होता. परंतु, फार मोजक्या लोकांना ठावूक आहे. अनेक सुपरस्टार्सने हा सिनेमा नाकारल्यानंतर तो शाहरुखच्या पदरात पडला. शाहरुख पूर्वी हा सिनेमा अजय देवगण, सलमान खान आणि अक्षय कुमार यांना ऑफर झाला होता.
या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत चाहत्यांसमोर आला होता. परंतु, नकारात्मक भूमिका असल्यामुळे सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण या तिघांनी ही भूमिका नाकारली होती. विशेष म्हणजे शाहरुखने नकारात्मक भूमिका करण्याचं चॅलेंज स्वीकारलं आणि हा सिनेमा सुपरहिट झाला.
दरम्यान, बाजीगरमध्ये काम करण्यापूर्वी शाहरुखने अन्य ७ सिनेमांमध्ये काम केलं होतं. मात्र, त्याला म्हणावी तशी ओळख मिळाली नव्हती. परंतु, बाजीगरमुळे तो संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाला.विशेष म्हणजे शाहरुख, अब्बास-मस्तान यांच्या ऑफिसमध्ये एका अन्य सिनेमासाठी गेला होता. मात्र, यावेळी त्यांनी शाहरुखसोबत बाजीगरविषयी चर्चा केली. या चर्चेतअंती शाहरुखने हा सिनेमा करण्यास होकार दिला.