पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. यावरून अभिनेत्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. आता अक्षयने यावर मौन सोडले आणि सांगितले की, ही जाहिरात ऑक्टोबर २०२१ मध्ये शूट करण्यात आली होती. जी ते पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत दाखवू शकतील.
आता अक्षय कुमारने त्याच्या X अकाउंटवर पान मसाला जाहिरातीवरील वादाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने एका चॅनेलला उत्तर दिले आणि लिहिले की, जर तुम्हाला इतर गोष्टींव्यतिरिक्त फेक न्यूजमध्ये स्वारस्य असेल, तर तुमच्यासाठी काही तथ्ये आहेत. या जाहिराती १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी शूट करण्यात आल्या होत्या. तेव्हाच मी या जाहिराती बंद करण्याची घोषणा केली. तेव्हापासून माझा ब्रँडशी काहीही संबंध नाही. ते पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत कायदेशीररित्या आधीच शूट केलेल्या जाहिराती चालवू शकतात. शांत राहा आणि खरी बातमी करा..''
व्हिडीओ पाहून चाहत्यांनी अभिनेत्याला केलं ट्रोलवास्तविक, अक्षय कुमारच्या या जाहिरातीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो शाहरुख खान आणि अजय देवगणसोबत तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये या तीन स्टार्ससोबत अभिनेत्री-मॉडेल सौंदर्या शर्मा देखील दिसत आहे. अक्षयचा हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच त्याचे चाहते संतापले आणि त्यांनी अभिनेत्याला ट्रोल करायला सुरूवात केली.
चाहत्यांनी अभिनेत्याला करून दिली त्याच्या वचनाची आठवण अभिनेत्याच्या या व्हिडिओवर टिप्पणी करताना, त्याच्या चाहत्यांनी आठवण करून दिली की त्याने यापूर्वी चाहत्यांची माफी मागितली होती आणि वचन दिले होते की तो ही जाहिरात पुन्हा कधीही करणार नाही. तुम्हाला वचन पाळता येत नसल्याचं चाहत्यांनी म्हटलंय आणि पुन्हा अजय देवगण आणि शाहरुख खानसोबत तुम्ही यासाठी जाहिरात केली आहे.अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अक्षय कुमार शेवटचा 'मिशन रानीगंज' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा देखील पाहायला मिळाली.