अक्षय कुमारचा (Akshay Kumar ) सेल्फी सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाचं अक्षयने जबरदस्त प्रमोशन केलं. पण ना प्रमोशन कामी आलं, ना अक्षयचा जलवा. सिनेमा सपशेल आपटला. अलीकडे आलेले अक्षयचे सिनेमे दणादण आपटत आहेत. सूर्यवंशी हा एक सिनेमा सोडला तर अक्षयचे सर्व सिनेमे फ्लॉप ठरलेत. एका कार्यक्रमात अक्षय या बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमांवर बोलला. सिनेमे फ्लॉप होण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल अक्षयला विचारण्यात आला.
यावर अक्षय म्हणाला, "माझ्यासोबत असं पहिल्यांदा घडलेलं नाहीये. माझ्या फिल्मी करिअरमध्ये मी अनेकदा अपयश पाहिलं. एकापाठोपाठ एक असे माझे १६ चित्रपट फ्लॉप गेलेत. एक वेळ अशी होती की मी माझ्याकडे सलग आठ चित्रपट आले जे चालले नाहीत. आता माझे लागोपाठ तीन-चार चित्रपट चाललेले नाहीत आणि यात माझीच चूक आहे. चित्रपट फ्लॉप होणं ही पूर्णपणे माझी चूक आहे. आता प्रेक्षक बदलले आहेत, त्यामुळे तुम्हालाही बदलण्याची गरज आहे. प्रेक्षकांचा इंटरेस्ट बदलला असेल तर तुम्हाला त्याचनुसार काम करावं लागणार. हा काळ माझ्यासाठी वॉर्निग आहे. तुमचे चित्रपट सलग फ्लॉप होत असतील तर ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. अशावेळी मी बदलण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मी एवढंच करू शकतो. चित्रपट चालत नसतील तर तो प्रेक्षकांचा दोष नाही. ही 100%. माझी चूक आहे. तुमची निवड चुकली असेल.”
सेल्फी नंतर येत्या काळात अक्षयचे अनेक सिनेमे रांगेत आहेत. महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात तो झळकणार आहे. ओह माय गॉड २, हेरा फेरी ३, बडे मिया छोटे मिया या चित्रपटातही तो दिसणार आहे.