Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमार त्याच्या नागरिकत्वावरुन अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याला सोशल मीडियावर 'कॅनडा कुमार' म्हणत ट्रोल केले जाते. तीन वर्षांपूर्वी अक्षय कुमारने सांगितले होते की, तो आता लवकरच भारतीयपासपोर्टसाठी अर्ज करणार आहे. आता त्या गोष्टीला तीन वर्षे झाली असून, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
मी भारतीयच आहेअक्षय कुमार नुकताच हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये सामील झाला होता. या समिटमध्ये अक्षयने तीन वर्षांपूर्वी त्याच्या भारतीय पासपोर्टबाबत केलेल्या विधानावर भाष्य केले. यावेळी पुन्हा त्याच्या पासपोर्टवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अक्षय म्हणाला, माझ्याकडे कॅनडियन पासपोर्ट आहे, पण मी इतरांपेक्षा कमी भारतीय नाही. मी इतरांप्रमाणेच भारतीय आहे. पासपोर्ट मिळाल्यापासून भारतातच राहत आलोय. मला त्यामागच्या कारणात जायचे नाही.
लवकरच भारतीय पासपोर्ट येईलअक्षय कुमार पुढे म्हणाला की, हो, मी 2019 मध्ये म्हणालो होतो की, मीही भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार आहे. पण, त्यानंतर महामारी आली आणि सर्व काम थांबले. आता मला माझे रिनाउंस पत्र मिळाले आहे आणि लवकरच पासपोर्टची प्रक्रीया पूर्ण होईल, अशी माहिती अक्षयने दिली.
अनेक चित्रपट करण्यावर अक्षय म्हणाला...एका वर्षात अनेक चित्रपट करण्याबाबत विचारले असता अक्षय कुमार म्हणाला, होय, मी एका वर्षात चार चित्रपट करतो, मी जाहिरात करतो. मी काम करतोय, चोरी नाही. काम करण्यात काय चूक आहे, हेच मला समजत नाहीये. मी काम करत राहीन. मला गरज पडली तर 50 दिवस देईन आणि गरज पडल्यास 90 दिवसही देईन, असे स्पष्ट मत अक्षयने व्यक्त केले.