फोटोतील ही व्यक्ती अभिनेत्री नाही तर अभिनेता आहे. वाचून आश्चर्य वाटले ना. पण होय, फोटोतील या अभिनेत्याचे नाव आहे, अक्षय कुमार. अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या आगामी चित्रपटाचे हे पोस्टर आहे. अक्षयने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले.या पोस्टरमध्ये अक्षयने लाल रंगाची साडी नेसलेली आहे. माथ्यावर लालभडक कुंकू, गळ्यात तावीज असा त्याचा अवतार आहे. त्याच्या मागे देवीची भव्य मूर्ती आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ चे पोस्टर शेअर करताना अक्षयने नवरात्रीचा अर्थही सांगितला आहे. ‘नवरात्रीचा अर्थ होतो, स्वत:मधील दैवी शक्तीसमोर नतमस्तक होणे आणि या अमर्याद शक्तीचे गुणगान करणे. नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर मी ‘लक्ष्मी’ या व्यक्तिरेखेचे लूक शेअर करतोय. एक अशी व्यक्तिरेखा जी साकारताना मी एक्साइटेड आहे आहे, तेवढाच नर्व्हस,’ असे अक्षयने हे पोस्टर शेअर करताना लिहिले आहे.
फसलात ना? ही अभिनेत्री नाही तर आहे बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:58 IST
फोटोतील व्यक्ती अभिनेत्री नाही तर अभिनेता आहे. वाचून आश्चर्य वाटले ना.
फसलात ना? ही अभिनेत्री नाही तर आहे बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता
ठळक मुद्दे या सिनेमात अक्षय एका ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारणार आहे.