Join us

‘सत्यमेव जयते’ला मागे टाकत ‘गोल्ड’ने कमावले इतके कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 14:07 IST

गत बुधवारी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. या दोन्ही चित्रपटांनी रिलीजच्या दिवसापासून बॉक्सआॅफिसवर धूम केली आहे.

गत बुधवारी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. या दोन्ही चित्रपटांनी रिलीजच्या दिवसापासून बॉक्सआॅफिसवर धूम केली आहे. पण कमाईच्या आकड्यात अक्षयने जॉनवर मात केली आहे. केवळ दोन दिवसांत ‘गोल्ड’ने ‘सत्यमेव जयते’ला मागे टाकले आहे. रिलीजच्या आधीच, हे दोन्ही चित्रपट जबरदस्त कमाई करतील, असा अंदाज वर्तवला गेला होता. झालेही तसेच. पहिल्याच दिवशी ‘गोल्ड’ने बंपर ओपनिंगसह एकूण २५.२५ कोटी रूपये कमावले. तर ‘सत्यमेव जयते’ने पहिल्या दिवशी २०.५२ कोटी रूपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ‘गोल्ड’ने ३०.२५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. तर ‘सत्यमेव जयते’ने २३.५२ कोटींचा बिझनेस केला़.‘गोल्ड’चा एकूण बजेट ८५ कोटी रूपये होता. दोन दिवसांत या चित्रपटाने ही लागत वसूल केली आहे. जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’बद्दल सांगायचे तर या चित्रपटाचा एकूण बजेट ५० कोटी रूपये होता. अक्षयच्या ‘गोल्ड’च्या तुलनेत हा बजेट कमी आहे.  पण जॉनचा चित्रपटही आपला हा बजेट वसूल करण्याच्या जवळपास पोहोचला आहे. या वीकेंडला ‘गोल्ड’ आणि ‘सत्यमेव जयते’ला मोठा फायदा होईल, असा कयास आहे. याचा थेट परिणाम चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये दिसेल. ‘गोल्ड’मध्ये अक्षय कुमारसह मौनी रॉय, विनीत कुमार सिंग, सनी कौशल, अमित साध यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर ‘सत्यमेव जयते’मध्ये जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी, आयशा शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. तूर्तास कमाईचे आकडे बघता, ‘गोल्ड’ आणि ‘सत्यमेव जयते’ यांचा बॉक्सआॅफिसवरचा मुकाबला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारसत्यमेव जयते चित्रपटजॉन अब्राहम