अक्षय कुमारला ‘बॉलिवूडचा खिलाडी’ म्हटले जाते ते उगाच नाही. एकापाठोपाठ एक हिट सिनेमे देणा-यांमध्ये अक्षयचे नाव सर्वात आघाडीवर आहे. तो बॉलिवूडचा सर्वाधिक बिझी अॅक्टर आहेत. अशात अक्षयची ब्रँड व्हॅल्यू वाढली नसेल तर नवल. होय, बॉलिवूड कलाकारांच्या ब्रँड रँकिंगमध्ये अक्षयने अव्वल स्थान पटकावले आहे. गत सलग दोन वर्षांपासून दीपिका पादुकोण दुसरे स्थान मिळवत या यादीत आघाडीवर होती. आता मात्र दीपिकाला मागे टाकत अक्षयने या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. क्रिकेटपटू विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दीपिका तिस-या क्रमांकावर फेकली गेली आहे.
या वर्षात अक्षय कुमारच्या ब्रँड व्हाल्यूमध्ये 55.3 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी ग्लोबल एडवायझरी फर्म, डफ अँड फेल्प्सने जारी केलेल्या लिस्टमध्ये अक्षय कुमारचे नाव दुस-या क्रमांकावर आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू 104 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 744 कोटी रुपये आहे, जी बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त आहे. मात्र पूर्ण लिस्टमध्ये टॉपवर क्रिकेटर विराट कोहली आहे. ज्याची ब्रँड व्हॅल्यू 237 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 1691 कोटी रुपये आहे.
गतवर्षी दुस-या क्रमांकावर असलेली दीपिका पदुकोण यावेळी एका क्रमांकाने मागे गेली. याऊलट तिचा पती रणवीर सिंह एका क्रमांकाने पुढे येऊन चौथ्यावरुन तिस-या क्रमांकावर पोहोचला आहे. दोघांची ब्रँड व्हॅल्यू प्रत्येकी सुमारे 665 कोटी रुपये आहे. दीपिकाने सीएए आणि एनआरसीचा विरोध करत असलेल्या जेएनयू स्टुडंट्ससोबत उभे राहून वादाला आमंत्रण दिले होते, त्यानंतर तिची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्याच्या बातम्या आल्या होत्या.टॉप ब्रँड व्हॅल्यू असलेल्या 20 जणांच्या यादीत 16 बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत तर 4 क्रिकेटर्स सामील आहेत.
या यादीत आमिर खान सर्वाधिक पिछाडल्याचे दिसतेय. त्याची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 178 कोटी रूपये आहे. रँकिंग म्हणाल तर आयुष्यमान खराणा, वरूण धवन, आलिया भट यांच्याही खाली जात 16 झाली आहेत. आमिर गतवर्षी या यादीत 11 व्या क्रमांकावर होता. शाहरूख खान, सलमान खान यांनी मात्र अनुक्रमे पाचवा व सहावा क्रमांक कायम राखला आहे.