Join us

जॉनी लिव्हरच नाही तर या सगळ्या बड्या कलाकारांनीही अभिनयाआधी केली आहेत अशी कामं ?वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 4:51 PM

आज जे सुपरस्टार बनले आहेत. त्यांनी अभिनयाआधी वेगळ्याच क्षेत्रात काम करत संघर्ष केला आहे. कोणी कधी फळे विकायचे. तर कोणी पेन, तर काहींनी वेटर म्हणून हॉटेलमध्येसुद्धा कामं केली आहेत.

चंदेरी दुनिया सर्वांनाच प्रभावित करते. प्रत्येक कलाकाराला येथे येऊन काम करून नाव कमवायचे आहे. साहजिकच ते तितकं सोपं नाही, पण चित्रपट जगतातील अनेक बड्या व्यक्ती आहेत ज्यांनी इथे येऊन काम केलं आणि नाव कमावलं. आश्‍चर्याची बाब म्हणजे आज जे सुपरस्टार बनले आहेत. त्यांनी अभिनयाआधी वेगळ्याच क्षेत्रात काम करत संघर्ष केला आहे. कोणी कधी फळे विकायचे. तर कोणी पेन, तर काहींनी वेटर म्हणून हॉटेलमध्येसुद्धा कामं केली आहेत.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार आज सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. एका वर्षात अनेक हिट चित्रपट देऊन करोडोंची कमाई करणाऱ्या अक्षयने  चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अक्षय बँकॉकमध्ये वेटर म्हणून काम करायचा आणि शेफ म्हणून त्याला फक्त 1500 रुपये मिळायचे. एवढेच नाही तर अक्षयने कुंदनचे दागिनेही मुंबईच्या रस्त्यांवर विकले आहेत.

बॉलिवूडचा टॅलेंटेड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये प्रचंड संघर्ष केला आहे , पण एक काळ असा होता जेव्हा नवाजने वॉचमनचे कामही केले होते. होय, यूपीच्या एका छोट्याशा गावात नवाजसाठी मायानगरीचा प्रवास सोपा नव्हता. चित्रपटात येण्यापूर्वी त्यांनी उदरनिर्वाहासाठी केमिस्टच्या दुकानात काम केले. एवढेच नाही तर वॉचमनची नोकरीही केली.

वयाच्या ५४ व्या वर्षीही मिलिंद सोमण त्याच्या फिटनेस आणि आकर्षक लुक्ससाठी ओळखला जातो. चित्रपटांमध्ये चांगलं नाव कमावलेला मिलिंद सोमण मायानगरीत येण्यापूर्वी हॉटेलमध्ये काम करायचा. मिलिंदच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन एके दिवशी हॉटेलमध्येच कोणीतरी मिलिंदचा फोटो काढला. मिलिंदने सांगितले होते की, हे त्याचे पहिले फोटोशूट होते आणि ही त्याच्या प्रवासाची सुरुवात होती.

बोमन इराणी यांनी आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. बोमन यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्राला जीवदान दिले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चित्रपटात येण्यापूर्वी बोमन आपल्या आईला बेकरीमध्ये उदरनिर्वाहासाठी मदत करत असे. इतकंच काय तर वेटर म्हणून काम करत होता.

अभिनेता जॉनी लीव्हर आज चित्रपटांपासून दूर असला तरी एक काळ असा होता की जॉनी लीव्हर जवळजवळ प्रत्येक चित्रपटात त्याच्या भन्नाट कॉमेडीने  रसिकांची पसंती मिळवली होती. चित्रपटांमध्ये नाव कमावण्यापूर्वी जॉनीने अनेक छोटी-मोठी कामे केली आहेत. रिपोर्टनुसार, जॉनी आपल्या घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर पेन विकायचा.

टॅग्स :अक्षय कुमारजॉनी लिव्हर