अक्षय कुमार (Akshay Kumar) व कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा बहुप्रतिक्षीत ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) कधी येतो, असं चाहत्यांना झालं होतं. कोरोना महामारीमुळे हा सिनेमा रखडला होता. पण अखेर प्रतीक्षा संपलीच. दिवाळीच्या मुहूर्तावर आज 5 नोव्हेंबरला भारतातील सुमारे 4000 स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज झाला. पण रिलीज होताच, सिनेमाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) व अक्षय कुमारचं टेन्शन मात्र वाढलं.
होय, रिलीज होऊन काही तास होत नाही तोच ‘सूर्यवंशी’ ऑनलाईन लीक झाल्याचं कळतंय. कोरोनानंतर सर्व बडे मेकर्स आपला सिनेमा ओटीटीवर रिलीज करत होते. पण रोहित शेट्टी ठाम होता. माझा चित्रपट मी फक्त मोठ्या पडद्यावरच रिलीज करणार, हा त्याचा इरादा पक्का होता. चित्रपटगृहे खुली होताच रोहितचा हा सिनेमा रिलीज झाला. पण आता अनेक वेबसाईटवर हा सिनेमा लीक झाल्याच्या बातम्या येत आहेत.
तामिळ रॉकर्सवर हा सिनेमा लीक झाल्याचं म्हटलं जातंय, याशिवाय टेलिग्रामच्या अनेक चॅनल्सवर आणि फिल्मी जिल्ला नामक वेबसाईटवरही हा सिनेमा एचडी प्रिंटमध्ये खुल्लमखुल्ला डाऊनलोड केला जातोय. ही बातमी मेकर्ससाठी मोठ्या टेन्शनचं कारण ठरू शकते. कारण चित्रपटावर 225 कोटी रूपये खर्च झालाय. अशात सिनेमा लीक झाल्यास मेकर्सला कोट्यवधी रूपयांचं नुकसान सोसावं लागू शकतं.
‘सूर्यवंशी’ हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा तिसरा चित्रपट आहे. याआधी सिंघम आणि सिम्बा हे दोन सिनेमे तुम्ही पाहिले असतीलच. ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय व कतरिना आहेत. जोडीला रणवीर सिंग व अजय देवगण यांचाही कॅमिओ आहे.