Join us

लॉकडाऊनच्या काळात अक्षय कुमार खऱ्या आयुष्यात बनला पॅडमॅन, वाटतोय महिलांना सॅनिटरी नॅपकिन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 1:09 PM

अक्षय आता खऱ्या आयुष्यात पॅडमॅन बनून महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे सध्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांचे प्रचंड हाल होत आहेत. मासिक पाळीच्या दरम्यान गरीब महिलांना स्वच्छता राखता यावी यासाठी आता अक्षय कुमार सॅनिटरी नॅपकिन वाटत आहे.

कोरोना महामारीचा फटका सर्वांनाच बसला आहे. लाखो लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. अनेकांचे बळी गेले आहेत. तर अनेकांसमोर या महामारीने जगण्यामरण्यााचा प्रश्न उभा केला आहे. रोजंदारीवर काम करणारे लोक आणि गरीबांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. निश्चितपणे समाजातील काही दानशूर व्यक्ती या लोकांच्या मदतीसाठी तत्पर आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्यापैकी एक. या संकटाच्या काळात आतापर्यंत अक्षयने अनेकपरीने मदत केली आहे. आता तर तो खऱ्या आयुष्यात पॅडमॅन बनून महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करत आहे. 

लॉकडाऊनमुळे सध्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांचे प्रचंड हाल होत आहेत. मासिक पाळीच्या दरम्यान गरीब महिलांना स्वच्छता राखता यावी यासाठी आता अक्षय कुमार सॅनिटरी नॅपकिन वाटत आहे. अक्षयने त्याच्या सोशल मीडियाद्वारे याविषयी माहिती दिली आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी एका चांगल्या गोष्टीला मी पाठिंबा देत आहे. पण यासाठी तुमच्या पाठिंब्याची देखील गरज आहे. कोविडच्या या संकटात मासिक पाळीमुळे गरीब महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि त्यामुळे मुंबईतील गरीब महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करत आहोत. यासाठी सगळ्यांनी मिळून डोनेशनद्वारे मदत करावी...

अक्षयने नुकतीच सिने आणि टिव्ही आर्टिस्ट असोसिएशनलाही 45 लाख रूपयांची मदत दिली आहे. सोबत काही पीपीई किट्स आणि मास्कचे त्याने वाटपही केले आहे. तसेच काही आठवड्यांपूर्वी त्याने पीएम फंडात 25 कोटी रूपयांची मदत दिली. यानंतर डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पीपीई आणि रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेला तीन कोटी रुपयांची रक्कम दान केली. मुंबई पोलिसांनाही त्याने 2 कोटींची मदत केली. शिवाय मुंबई पोलिसांना 1000 सेन्सर बॅण्डही भेट म्हणून दिले. या हेल्थ बॅण्डच्या मदतीने कोरोनाचा धोका आधीच लक्षात येतो.

टॅग्स :अक्षय कुमारपॅडमॅन