Join us  

'Woh Pehli Barsaat :  17 वर्षानंतर रिलीज झालं प्रियंका चोप्रा व अक्षय कुमारचं गाणं, खास आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 2:56 PM

Akshay Kumar-Priyanka Chopra’s unseen song : हे गाणं 2005 साली शूट झालं होतं आणि आत्ता तब्बल 17 वर्षानंतर ते रिलीज करण्यात आलं आहे. ‘वो पहिली बरसात’ असं या गाण्याचं नाव आहे.

Akshay Kumar-Priyanka Chopra’s unseen song : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांची ऑनस्क्रीन जोडी प्रचंड गाजली. ऐतराज व मुझसे शादी करोगी यासारख्या सुपरहिट चित्रपटात या जोडीनं एकत्र काम केलं. मात्र ‘वक्त’नंतर ही जोडी पुन्हा कधीच एकत्र दिसली नाही. तुम्हीही या जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स मिस करत असाल तर आता तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. होय, अक्षय कुमार व प्रियंका यांचं एक गाणं रिलीज झालं आहे.या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, हे गाणं 2005 साली शूट झालं होतं आणि आत्ता तब्बल 17 वर्षानंतर ते रिलीज करण्यात आलं आहे. ‘वो पहिली बरसात’ असं या गाण्याचं नाव आहे. ‘बरसात’ या चित्रपटासाठी अक्षय व प्रियंकाने हे गाणं शूट केलं होतं. पण नंतर अक्षय या सिनेमातून अचानक बाहेर पडला होता. यानंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी प्रियंका व बॉबी देओल यांना घेऊन हा चित्रपट बनवला होता.

‘बरसात’चा टायटल ट्रॅक तुम्हाला आठवत असेलच. बरसात के दिन आए... या शब्दांनी या गाण्याची सुरूवात होते. हे गाणं प्रियंका व बॉबी देओलवर शूट झालं. पण हेच गाणं सर्वप्रथम अक्षय व प्रियंकाने शूट केलं होतं.‘बरसात’मधील गाणं आणि आत्ताचं हे गाणं दोन्ही गाणी सेम लोकेशन व सेटिंगवर शूट झाली आहेत. फक्त बदलला तो प्रियंकाचा ड्रेस. होय, अक्षयसोबत हे गाणं शूट करताना प्रियंकाने पांढ-या गुलाबी रंगाची शॉर्ट कुर्ती व चूडीदार घातला होता. बॉबी देओलसोबतच्या गाण्यात प्रियंकाचा ड्रेस नियॉन ग्रीन कलरचा आहे. समीर यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून या गाण्याला नदीम श्रवण यांनी सांगीतिबद्ध केलं आहे. तर हे गाणे कुमार सानू आणि अल्का याज्ञिक यांनी गायलं आहे.  

  

टॅग्स :अक्षय कुमारप्रियंका चोप्राबॉलिवूड