२०२२ मध्ये सर्वाधिक पाहिले गेलेले चित्रपट आणि मालिकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पूजा एंटरटेनमेंटचा कटपुतली (Cuttputlli Movie) चित्रपट या यादीत टॉपवर आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर होता आणि २०२२ मध्ये प्रदर्शित झाला आहे. डिस्ने+ हॉटस्टारने २०२२ या वर्षातील सर्वाधिक प्रवाहित चित्रपट आणि मालिकांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. मीडिया सल्लागार फर्म Ormax च्या अहवालानुसार, पूजा एंटरटेनमेंटचा कटपुतली हा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे.
कठपुतली या चित्रपटात अक्षय कुमार आणि रकुल प्रीत सिंगसोबत टेलिव्हिजन स्टार सरगुन मेहता, जोशुआ लेक्लेअर आणि चंद्रचूर सिंह यांनीही काम केले आहे. चित्रपट रिलीज झाल्यावर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. या चित्रपटाची पटकथा, कथा, पात्र, संगीत, निर्मिती रचना आणि अभिनय या सर्व गोष्टी उत्कृष्ट आहेत. कठपुतलीला २६.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि यासह हा चित्रपट २०२२ मध्ये सर्वाधिक पाहिलेला मूळ हिंदी चित्रपट बनला आहे.
२०२२ मध्ये, डिस्ने प्लस हॉटस्टारने त्याच्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिलेले १५ मालिका आणि चित्रपटांपैकी ७ स्ट्रीम केले. OTT मूळ प्रेक्षकांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले. यामध्ये पूजा एंटरटेनमेंटच्या कठपुतलीला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याचाच अर्थ कटपुतली हा डिस्नेचा अव्वल चित्रपटच नाही तर डिजिटली पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीतही अव्वल आहे. ए थर्सडे, गोविंदा नाम मेरा, फ्रेडी, गहराईयांसारख्या चित्रपटांचा या यादीत समावेश आहे, परंतु अक्षय कुमार आणि रकुल प्रीत सिंग स्टारर चित्रपटाला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पूजा एंटरटेनमेंटच्या कटपुतलीला २६.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, जे इतर कोणत्याही चित्रपटाला OTT मध्ये मिळालेले नाहीत. हा चित्रपट संपूर्ण OTT जगात सर्वाधिक पाहिला गेला आहे.
दुसरीकडे, अक्षय कुमारने डिसेंबर २०२२ मध्ये टॉप टेन बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. याआधी अक्षय कुमार स्टारर लक्ष्मीने देखील रेकॉर्ड तोडले होते, जो २०२० मध्ये रिलीज झाला होता. कठपुतलीच्या यशानंतर आता २०२३ मध्ये गणपत, कॅप्सूल गिल, बडे मियाँ छोटे मियाँ आणि पूजा एंटरटेनमेंटचे कर्ण सारखे बिग बजेट चित्रपट येत आहेत.