Join us

एकामागोमाग एक फ्लॉप! चाहते म्हणाले ४ पेक्षा एकच सिनेमा कर; अक्षयने दिलं उत्तर, म्हणतो- "बाकी दिवस तुझ्या घरी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 10:38 AM

एकामागोमाग एक सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर अक्षयला ट्रोल केलं जात आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षयने याबाबत मौन सोडत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार सध्या त्याच्या 'सरफिरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अक्षय कुमारचा हा सिनेमा प्रदर्शित झाला. अक्षयचा हा सिनेमा तरी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवेल अशी अपेक्षा होती. पण, ही चाहत्यांची ही अपेक्षाही फोल ठरली आहे. एकामागोमाग एक सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर अक्षयला ट्रोल केलं जात आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षयने याबाबत मौन सोडत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

अक्षयने नुकतीच गजल अलघला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. अक्षयने वर्षभरात चार सिनेमे करण्यापेक्षा एकाच सिनेमावर फोकस करायला हवा, असं म्हणत अक्षयला ट्रोल केलं गेलं होतं. आता यावर त्याने ट्रोलर्सला उत्तर देत सुनावलं आहे. अक्षय म्हणाला, "ठिक आहे...मी वर्षातून एकच सिनेमा करेन...पण मग बाकी दिवस मी काय करू? तुझ्या घरी येऊन राहू का?". ज्यांना काम मिळतं ते लोक नशीबवान असतात, असंही अक्षय पुढे म्हणाला. 

"इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नाही. ज्यांना काम मिळतं ते लोक खरंच नशीबवान आहेत. माझ्याकडे काम नाहीये, बेरोजगारी आहे...असं म्हणणारं कोणी ना कोणी भेटतच. ज्यांना काम मिळतंय, ज्यांच्याकडे काम आहे... त्यांना काम करू दिलं पाहिजे", असंही अक्षयने सांगितलं. 

अक्षय कुमारचा सरफिरा चित्रपट १२ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. पण, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार जादू दाखवू शकला नाही. गेल्या दोन-तीन वर्षात अक्षयचे जवळपास ८-९ सिनेमे फ्लॉप गेले आहेत. OMG 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण, हा सिनेमाही सुपरहिट ठरला नाही. आता अक्षय खेल खेल मे सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटीसिनेमा